Pune Viral Video : पुणेरी दणका! ‘या तुमची आरती ओवाळते’, महिलेचं कृत्य पाहून बाईकस्वारांनाही लाज वाटली

रस्त्यावर झालेल्या कोंडीमुळे अनेक दुचाकीस्वारांनी फुटपाथचा मार्ग निवडला. मात्र, त्या प्रत्येक दुचाकीस्वाराच्या मागे धावत ही महिला त्यांना 'पुणेरी ट्रीटमेंट' देताना दिसत आहे.

Pune Viral Video : पुणेरी दणका! ‘या तुमची आरती ओवाळते’, महिलेचं कृत्य पाहून बाईकस्वारांनाही लाज वाटली

Puneri Shock to Bikers : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांना पुण्यातील एका महिलेने पुणेरी दणका दिला आहे. नियमांची पायमल्ली केल्यास चोखंदळ पुणेकर कसा खोचक टोला लगावू शकतो, याचे उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत पाहायला मिळते. पुण्यातील पाषाण परिसरात ही घटना घडली आहे.

टोमणा मारत केली नियमभंगाची जाणीव
पुण्यातील या व्हिडिओमध्ये, चक्क फुटपाथवरून दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांना (Two-Wheeler Riders) एका महिलेने थेट हात जोडत “या तुमची आरती ओवाळते” असा खोचक निरोप दिला. रस्त्यावर झालेल्या कोंडीमुळे (Traffic Jam) अनेक दुचाकीस्वारांनी फुटपाथचा मार्ग निवडला. मात्र, त्या प्रत्येक दुचाकीस्वाराच्या मागे धावत ही महिला त्यांना नियमभंगाबद्दल पाणउतारा करताना दिसत आहे.

हेही वाचा – Viral Video: टेकऑफच्या आधीच इंडिगो विमानात कबुतराच्या घिरट्या, व्हिडीओ व्हायरल

उपहासात्मक अपमानाचा व्हिडिओ
पुण्यात पुणेकर तुमचा कुठल्याही थराला जाऊन अपमान करू शकतात. मग तो कधी उपहासात्मक असू शकतो किंवा कधी थेट अपमान करणारा सुद्धा असू शकतो. पुण्यातील पाषाण भागातून असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे, जिथे महिलेने वाहन चालकांना हाताने नमस्कार करत, अपमानास्पद टोला लगावला. एवढेच नाही, तर ही महिला त्यांच्या पाठीमागे धावताना सुद्धा दिसत आहे.

पाषाण भागातील व्हिडिओ तुफान व्हायरल
रस्त्यावर झालेली कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकीस्वारांनी फुटपाथवरून जाणे पसंत केले, पण अशा नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांना या महिलेने थांबवून त्यांची जाहीरपणे चूक दाखवून दिली. पुण्यातील पाषाण भागातील हा व्हिडिओ असल्याचे बोलले जात असून, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Supriya Sule Kangana Ranaut Dance Video: खासदार सुप्रिया सुळे, कंगना रणौत आणि महुआ मोईत्रा यांचा एकत्र डान्स! 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number