Pune Water Supply: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वीच पुणेकरांचे हाल; जलवाहिनी फुटल्याने वीकेंडला ‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद

शहरात दोन ठिकाणी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने कोथरूड, बाणेर ते हडपसरपर्यंतच्या विशाल परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

Pune Water Supply: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वीच पुणेकरांचे हाल; जलवाहिनी फुटल्याने वीकेंडला ‘या’ भागात राहणार पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply: नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीत असलेल्या पुणेकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी रात्री शहरात दोन ठिकाणी मुख्य जलवाहिन्या फुटल्याने कोथरूड, बाणेर ते हडपसरपर्यंतच्या विशाल परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिकेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी शनिवारीही अनेक भागांत नळांना पाणी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री पुण्यातील दोन महत्त्वाच्या जलवाहिन्या फुटल्या. खडकवासला ते वारजे दरम्यानची वारजे ते होळकर ही मुख्य वाहिनी फुटल्याने पश्चिम पुण्याचा पुरवठा खंडित झाला. तसेच कर्वेनगर परिसरात रामटेकडी टाकीला पाणी पुरवणारी मुख्य वाहिनी अचानक फुटली, ज्यामुळे पूर्व पुण्याच्या मोठ्या भागावर परिणाम झाला.

हेही वाचा – Nagpur News : नागपूर हादरलं! 6 ते 8 महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून उचललं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

पाणी कपातीचा 'या' भागांना फटका

दोन वेगवेगळ्या जलवाहिन्या फुटल्याने पुणे शहराचे दोन भाग प्रभावित झाले आहेत: पश्चिम पुण्यातील कोथरूड, पौड रोड, बाणेर, बालेवाडी, बावधन आणि पाषाण भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. तसेच बावधन आणि बाणेर परिसरात पहाटे अत्यंत कमी दाबाने पाणी मिळाले आणि त्यानंतर पुरवठा पूर्णपणे बंद झाला. माजी नगरसेवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय पूर्व पुण्यात संपूर्ण हडपसर, ससाणे नगर, सय्यदनगर, महंमदवाडी, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, गाडीतळ, चिंतामणी नगर आणि महंमदवाडी गावठाण. सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, साडेसतरा नळी, मगरपट्टा सिटी, आकाशवाणी, मुंढवा आणि केशवनगर भागात पाणीपुरवठा खंडित झाला. 

हेही वाचा – Pune Election 2026: हातात बेड्या, तोंडावर स्कार्फ अन् पोलीस व्हॅनमधून 'सिनेस्टाईल' एन्ट्री; पुण्यात आंदेकर टोळीच्या म्होरक्याचा उमेदवारी अर्ज दाखल

प्रशासनाची भूमिका

पुणे महानगरपालिकेने रात्रीपासूनच दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मात्र, गळतीचे स्वरूप मोठे असल्याने दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणि दाबाने पाणी मिळण्यासाठी आणखी काही तासांचा कालावधी लागू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number