Pune Heavy Rain : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान! आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू; घाट परिसरातील शाळा बंद तर शहरात शाळा सुरू राहतील

पुणे जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे घाट परिसरातील शाळा बंद राहतील. तर, शहरातील शाळा सुरू राहतील. याशिवाय, जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक सूचना आणि नियमावली जारी केले आहेत.

Pune Heavy Rain : पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान! आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू; घाट परिसरातील शाळा बंद तर शहरात शाळा सुरू राहतील

Pune Heavy Rain : गेल्या 4 दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार, सह्याद्रीच्या घाट परिसरातील शाळा म्हणजेच मावळ, मुळशी, भोर, वेल्हा आणि आंबेगाव तालुक्यातील शैक्षणिक संस्था उद्याही पूर्णपणे बंद राहतील. याउलट, पुणे शहर आणि जिल्ह्यातील इतर मैदानी तालुक्यांमधील शाळा उद्या नियमितपणे सुरू राहतील. हवामान खात्याने उद्यासाठी पुणे शहराला 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अतिवृष्टीमुळे दुर्घटना; 5 जणांचा दुर्दैवी अंत
जिल्ह्यात कोसळणाऱ्या या भीषण पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 20 जण जखमी झाले आहेत. मावळ तालुक्यातील पाटण गावात दरड कोसळून 3 लोकांचा मृत्यू झाला असून, तेथील रेस्क्यू ऑपरेशन (बचाव कार्य) आता पूर्ण झाले आहे. याशिवाय, पिंपरी-चिंचवड (PCMC) परिसरात भिंत कोसळल्याने 1 व्यक्तीचा आणि खेड तालुक्यात 1 जण पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गेल्या 2 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 22 ठिकाणी लहान-मोठ्या दरडी कोसळल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. लोणावळा आणि आसपासच्या भागात सध्या मोठ्या प्रमाणावर मदतकार्य राबवले जात आहे.

हेही वाचा – Krishna River Water Level: संततधार पावसादरम्यान नृसिंहवाडीत भक्तीमय वातावरण; 'दक्षिणद्वार सोहळ्याची' भाविकांमध्ये उत्सुकता

धोकादायक गड-किल्ले पर्यटनासाठी तात्पुरते बंद
पावसाचा जोर पाहता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व किल्ले आणि पर्यटनस्थळे अतिवृष्टीमुळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. तसेच, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 9 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले असून, यात प्रसिद्ध वरंधा घाट रस्ताही समाविष्ट आहे. दरम्यान, एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' दुर्घटनेबाबत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, तिथला स्लॅब आणि ढिगारा हटवण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच हा कनेक्टिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.

वारकऱ्यांना आळंदी आणि देहूला न जाण्याचे आवाहन
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी वारकऱ्यांना आणि भाविकांना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. इंद्रायणी नदीला आलेला पूर आणि अतिवृष्टीमुळे देहू तसेच आळंदी परिसराला पाण्याचा वेढा पडला आहे. त्यामुळे सर्व वारकऱ्यांनी सध्या तरी या दोन्ही पवित्र ठिकाणी जाणे टाळावे. सुरक्षेचा उपाय म्हणून वारकऱ्यांनी एकतर पुणे शहरातील मुक्कामी वारीत सहभागी व्हावे किंवा थेट त्यापुढील नियोजित मुक्कामाच्या ठिकाणी वारीमध्ये सामील व्हावे, जेणेकरून पुराच्या पाण्यात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही.

हेही वाचा – MSRTC Bus Cancelled: पावसामुळे 'लालपरी'ला ब्रेक! 2 दिवसांत 7 हजारहून अधिक ST फेऱ्या रद्द; एका दिवसात 1.60 कोटींचे आर्थिक नुकसान

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number