Superfast Special Train : पुणे-नागपूर प्रवाशांची गर्दी ओसरणार; मध्य रेल्वेकडून 24 विशेष फेऱ्यांची घोषणा, पाहा सविस्तर वेळापत्रक

मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या दरम्यान एकूण 24 विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

Superfast Special Train : पुणे-नागपूर प्रवाशांची गर्दी ओसरणार; मध्य रेल्वेकडून 24 विशेष फेऱ्यांची घोषणा, पाहा सविस्तर वेळापत्रक

Superfast Special Train : पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणाऱ्या पुणे-नागपूर मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने दिलासादायक निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या मार्गावर विशेष गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी आणि पुणे ते नागपूर या दरम्यान एकूण 24 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले असून, त्यातील पुणे-नागपूर सुपरफास्ट गाड्यांच्या फेऱ्या फेब्रुवारी महिन्यात चालवल्या जाणार आहेत. 

पुणे – नागपूर विशेष रेल्वेचे वेळापत्रक:
1. पुणे ते नागपूर (गाडी क्र. 01467):

ही गाडी 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी पुणे स्थानकावरून दुपारी 3.50 वाजता सुटेल.

नागपूरला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पोहोचेल.

2. नागपूर ते पुणे (गाडी क्र. 01468):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी 14 आणि 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून निघेल.

ही गाडी त्याच दिवशी रात्री 11.30 वाजता पुणे स्थानकावर दाखल होईल.

सुपरफास्ट विशेष फेऱ्यांचे नियोजन:
नियमित विशेष गाड्यांव्यतिरिक्त आणखी दोन सुपरफास्ट फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे:

गाडी क्र. 01419: 18 फेब्रुवारी रोजी पुण्यातून दुपारी 3.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल.

गाडी क्र. 01420: 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूरहून प्रस्थान करेल आणि रात्री 11.30 वाजता पुण्यात येईल.

हेही वाचा – Shaktipeeth Highway Farmers Oppose : शक्तिपीठ महामार्गाला मोरवडमध्ये तीव्र विरोध; सक्तीने मोजणीचा प्रयत्न करताच शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल..

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:
सण, परीक्षा आणि वैयक्तिक कामासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या गाड्या धावणार आहेत. या विशेष गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या अधिकृत तिकीट खिडक्यांवर (Reservation Centers) तसेच IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. प्रवाशांनी वेळापत्रक आणि थांब्यांची खात्री करून आपले तिकीट आरक्षित करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number