Ketan Agrawal Case : केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया चेतनची प्रेयसी नव्हे तर पत्नी? व्हॉट्सॲप चॅटने उघड केलं गुपित

केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी आरोपींनी आधीपासूनच क्रूर कट रचला होता. 18 जून रोजी त्या दोघांनी मिळून केतनला लोहगडावरून दरीत ढकलून दिले आणि त्याची हत्या केली.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया चेतनची प्रेयसी नव्हे तर पत्नी? व्हॉट्सॲप चॅटने उघड केलं गुपित

Pune Lohagad Fort Ketan Agrawal Murder Update : पुण्यातील लोणावळ्याजवळील ऐतिहासिक लोहगडावरून ढकलून देऊन व्यावसायिक केतन अग्रवाल यांची करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. केतनची होणारी पत्नी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल ही आधीच विवाहित असल्याची धक्कादायक बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट्स आणि गेल्या 6 ते 7 महिन्यांतील इंटरनेट सर्च हिस्ट्रीची सखोल पडताळणी केली. या तपासात दोघांनी घरच्यांच्या भीतीने 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केले असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या डिजिटल पुराव्यांनी आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण दिले आहे.

पहिला प्रयत्न फसला; सियाने प्रियकराला बोलावले
केतन अग्रवालचा काटा काढण्यासाठी आरोपींनी आधीपासूनच क्रूर कट रचला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, केतनचा खून करण्याचा पहिला प्रयत्न 14 जून रोजी करण्यात आला होता. मात्र, त्या दिवशी प्रत्यक्षात गुन्हा करताना सियाची हिंमत झाली नाही आणि ती घाबरल्याने तो प्रयत्न अपयशी ठरला. त्यानंतर सियाने चेतनला व्हॉट्सॲपवर मेसेज केला, 'माझं डेअरिंग होत नाहीये; तूही चल. आपण दोघे मिळून त्याला दरीत ढकलून देऊ.' अखेर यानंतर 18 जून रोजी त्या दोघांनी मिळून केतनला लोहगडावरून दरीत ढकलून दिले आणि त्याची हत्या केली.

हेही वाचा – Pune Ketan Agrawal Case : 'माझं डेअरिंग होत नाही…' केतनला संपवण्यासाठी सिया-चेतनने असा आखला होता मास्टर प्लॅन; एका चॅटने उघड झाले कटकारस्थान

त्रिकोणी प्रेमाच्या कथेमागे लपलेलं क्रूर सत्य
सुरुवातीला पोलिसांना हे प्रकरण निव्वळ एका त्रिकोणी प्रेमाचे वाटत होते. मात्र, आरोपींचे आधीच लग्न झाल्याचे समोर आल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. स्वतःचे लग्न लपवून सियाने केतनसोबत सोयरीक जुळवली होती. त्यानंतर केतनला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा हा भयानक कट तिने पती चेतनच्या सोबतीने अमलात आणला. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक केली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

लोणावळा परिसरात खळबळ आणि पुढील तपास
18 जून रोजी घडलेल्या या थरारक हत्याकांडाने संपूर्ण पुणे आणि लोणावळा परिसरात मोठी खळबळ उडवून दिली होती. व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक टीमची मदत घेतली, ज्यामध्ये आरोपींचे कॉल रेकॉर्ड्स आणि लोकेशन महत्त्वाचे ठरले. सध्या पोलीस या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेत आहेत. मात्र, लग्न झालेल्या जोडप्याने मिळून एका तरुणाचा असा क्रूर बळी घेतल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य कमालीचे वाढले आहे.

हेही वाचा – Crime News: आधी पतीला गच्चीवरून ढकललं, नंतर सलाईनमधून टॉयलेट क्लिनर दिलं… नर्स पत्नीचं सियापेक्षाही भयंकर कांड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number