Pune Ketan Agarwal Case Video: साखरपुड्यातील ‘तो’ व्हिडिओ म्हणजे नुसता खोटारडेपणा; केतन अग्रवालच्या कौतुकाचा आव आणणारी सिया गोयल पाहिली का?

केतन अग्रवालच्या हत्येच्या हाय-प्रोफाइल प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता सियाचा साखपुड्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

Pune Ketan Agarwal Case Video: साखरपुड्यातील ‘तो’ व्हिडिओ म्हणजे नुसता खोटारडेपणा; केतन अग्रवालच्या कौतुकाचा आव आणणारी सिया गोयल पाहिली का?

Ketan Agarwal Case Update: पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या कारवाईच्या काही दिवसांतच सिया आणि केतन यांच्या साखरपुड्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या या साखरपुडा सोहळ्याच्या व्हिडिओ क्लिपमध्ये सिया आपल्या होणाऱ्या पतीच्या स्वभावाचे तोंडभरून कौतुक करताना दिसत आहे. परंतु हा केवळ एक बेमालूम बनाव होता, हे आता पोलीस तपासातून समोर आले आहे, कारण या सोहळ्यानंतर काही दिवसांतच तिने प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढला.

‘हिरो नंबर वन’च्या प्रश्नावर सियाने दिली होती खोट्या प्रशंसेची थाप
त्या भव्य सोहळ्यात सूत्रसंचालकाने सिया आणि केतनला स्टेजवर एकमेकांबद्दल काही प्रश्न विचारले होते. अँकरने विचारले होते की, होणारा नवरा म्हणून केतनच्या स्वभावातील कुठली गोष्ट तुम्हाला सर्वाधिक भावते, ज्यावरून तुम्हाला वाटतं की हा तुमचा हिरो नंबर वन आहे? यावर अत्यंत लाजत आणि हसत सियाने तो खूप दयाळू आणि केअरिंग असल्याचे सांगितले होते. हा खोटा कौतुकाचा वर्षाव करत असताना दोघांनी स्टेजवर एकमेकांचे हात घट्ट धरले होते आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या होत्या.

लोहगड किल्ल्यावरून ढकलून हत्या; आरोपींनी आधीच केला होता गुपचुप विवाह
या हाय-प्रोफाइल प्रकरणात आता एकामागून एक धक्कादायक खुलासे होत असून पुणे ग्रामीण पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. नियोजित वर केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून अत्यंत निर्घृणपणे मारल्याचा आरोप सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर आहे. या दोघांनी साखरपुड्यापूर्वीच राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुपचुप विवाह केला होता, असा दावा केला जात आहे. या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका विशेष पथकाने नुकतीच त्या मंदिराला भेट दिली, मात्र मंदिर प्रशासकांकडे तपास केला असता परिसरातील कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही.

हेही वाचा – Shirdi Crime News : भयंकर! महिलांच्या घोळक्याकडून फळविक्रेत्या महिलेवर चाकूने सपासप वार; साई मंदिर परिसरात खळबळ

राखी अग्रवाल यांचे पंतप्रधानांना भावूक पत्र; नातवाच्या शोकामुळे आजोबांचाही मृत्यू
मुलाच्या जाण्याने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या हत्याप्रकरणात स्वतः लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी पत्रात केली आहे. मुलाच्या हत्येमुळे घरातील प्रत्येक कोपरा त्याची आठवण करून देतो आणि आपले संपूर्ण जगच उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. यासोबतच कुटुंबावर ओढवलेल्या दुहेरी संकटाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, आपल्या लाडक्या नातवाच्या हत्येचा तीव्र धक्का सहन न झाल्यामुळे केतनच्या आजोबांचेही अवघ्या 3 आठवड्यांच्या आत दुःखद निधन झाले.

येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी; पोलीस गोळा करत आहेत डिजिटल पुरावे
सध्या सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवल्यामुळे पोलिसांना तपासासाठी अधिक वेळ मिळाला आहे. या प्रकरणातील गुंतागुंत पाहता पोलीस आता तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत असून आरोपींचे जुने चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासले जात आहेत. साखरपुड्यातील हा खोटा व्हिडिओ आणि त्यानंतर घडलेली क्रूर घटना पाहता, हे हत्याकांड अत्यंत थंड डोक्याने आखलेला एक पूर्वनियोजित कट होता, या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत.

हेही वाचा – Crime News : 25 वर्षीय महिला इंजिनिअरच्या मृत्यूचे गूढ; विवस्त्र अवस्थेत देवीची मूर्ती चोरून तलावात घेतली होती उडी

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number