Pune Traffic Updates: वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज, पण ‘या’ मार्गांवरून प्रवास टाळा; 11 जुलैला हडपसर-सोलापूर रस्ता 10 तास बंद, पाहा पर्यायी मार्ग

अग्निशामक दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि इंधन वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना पालखी मार्गावर प्रवेश बंदी असेल.

Pune Traffic Updates: वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुणे सज्ज, पण ‘या’ मार्गांवरून प्रवास टाळा; 11 जुलैला हडपसर-सोलापूर रस्ता 10 तास बंद, पाहा पर्यायी मार्ग

Pune Traffic Updates: पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे 9 जुलै रोजी भव्य आगमन होत आहे. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर या पालख्या सोलापूर आणि सासवड मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. या काळात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पुणे वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. अग्निशामक दल, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि इंधन वाहने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना पालखी मार्गावर प्रवेश बंदी असेल. पालखी मार्गाला छेदणाऱ्या उप-रस्त्यांवर 100 मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारच्या वाहन पार्किंगला तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा – Flash Flood Warning : पुढील 24 तास महत्त्वाचे, महाराष्ट्रासह ‘या’ तीन राज्यांमध्ये पूरपरिस्थितीची शक्यता; IMD चा सतर्कतेचा इशारा

11 जुलै रोजी पालख्यांचे पंढरपूरकडे प्रस्थान; टप्प्याटप्प्याने मार्ग होणार बंद
दरम्यान, शनिवार, 11 जुलै रोजी दोन्ही पालख्या पुण्यातून पुढे मार्गस्थ होतील. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतील विठोबा मंदिरापासून निघून रामोशीगेट, पुलगेट, सोलापूर रोड आणि हडपसर गाडीतळ मार्गे दिवेघाटातून सासवडकडे जाईल. तर संत तुकाराम महाराजांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरापासून निघून ए.डी. कॅम्प चौक, पुलगेट आणि सोलापूर रोडने हडपसर गाडीतळ मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामासाठी पोहोचेल. 11 जुलै रोजी पहाटे 2:00 वाजल्यापासून पालख्या पुणे पोलीस आयुक्तालयाची हद्द ओलांडेपर्यंत संबंधित मार्ग टप्प्याटप्प्याने बंद केले जातील. जसा पालखी सोहळा पुढे जाईल, तसा मागील रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्यात येईल.

हडपसर-सोलापूर रस्ता पूर्णपणे बंद; वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
पालखी प्रस्थानाच्या दिवशी, म्हणजेच 11 जुलै रोजी पहाटे 2:00 वाजेपासून ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत हडपसर ते सोलापूर रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत वाहनचालकांनी मगरपट्टा, खराडी बायपास आणि वाघोली मार्गे नगर रोडचा पर्यायी मार्ग वापरून आपल्या इच्छित स्थळी जावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 12 जुलै रोजी पहाटे लोणी काळभोर येथून यवत मार्गे पुढे मार्गस्थ होईल. पालखी सोहळा शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number