Pune Hospital Bomb Threat: पुण्यात हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी! पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण शॉकिंग

काही दिवसांपूर्वी आरोपी शिवाजी राठोड उपचारासाठी उषाकिरण रुग्णालयात आला होता, जिथे त्याला डॉक्टरांनी उपचाराच्या खर्चाचा आकडा सांगितला. त्यानंतर...

Pune Hospital Bomb Threat: पुण्यात हॉस्पिटलला बॉम्बने उडवण्याची धमकी! पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कारण शॉकिंग

Pune Hospital Bomb Threat : पुण्यातील हडपसर भागातील उषाकिरण रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवून खळबळ उडवून देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी राठोड असे या आरोपीचे नाव असून त्याला नागपूर रेल्वे स्थानक परिसरातून पुणे पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत ताब्यात घेतले. आरोपीला एका लैगिक आजाराच्या उपचारासाठी 7 लाख रुपयांची तातडीने गरज होती आणि ती रक्कम उकळण्यासाठीच त्याने हॉस्पिटलमध्ये असा प्रकार केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला असून आरोपी कोलकात्याला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच त्याला पकडण्यात आले.

कसा रचला होता हा थरारक कट?
काही दिवसांपूर्वी आरोपी शिवाजी राठोड उपचारासाठी उषाकिरण रुग्णालयात आला होता, जिथे त्याला डॉक्टरांनी उपचाराच्या खर्चाचा आकडा सांगितला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. त्याने रुग्णालयाच्या स्वच्छतागृहात मुद्दामहून टाइमर लावलेली बॉम्बसदृश्य वस्तू ठेवली ज्याणं भीती पसरेल. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे ही वस्तू वेळेत सापडली आणि मोठा अनर्थ टळला.  माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर रिकामा केला. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला.

हेही वाचा – Crime News: विद्येच्या मंदिरातच लज्जास्पद कृत्य! अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; शिक्षिकेने तळघरात नेलं अन्…

नागपुरातून अटक
रुग्णालयात बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर पुणे पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान होते. तपासादरम्यान शिवाजी राठोड संशयास्पद हालचाली करताना आढळला आणि तो पुण्याबाहेर पळाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तो रेल्वेने प्रवास करत असल्याचे शोधून काढले. नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले, तेव्हा तो राज्याबाहेर निसटण्याच्या तयारीत होता. सध्या त्याला पुण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. रुग्णालयांची सुरक्षा यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे पुण्यातील सर्वच मोठ्या रुग्णालयांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पैशांच्या गरजेपोटी एखादी व्यक्ती इतके टोकाचे पाऊल उचलू शकते, यामुळे नागरिक आणि प्रशासन दोन्ही चिंतेत आहेत. हडपसर परिसरात या घटनेनंतर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून रुग्णालयांना त्यांच्या परिसरात येणाऱ्या व्यक्तींची नीट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number