CRIME : गणपती विसर्जनाला गालबोट; मंडळ अध्यक्षाचा मृत्यू, दोन दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण

अहिल्यानगर जवळील भिंगार शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. शुल्केश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपर वागस्कर यांचा मिरवणुकीत मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला होता. याच मृत्यूवरुन दोन वेगवेगळे दावे सध्या केले जात आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, काल मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये वागस्कर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या […]

CRIME : गणपती विसर्जनाला गालबोट; मंडळ अध्यक्षाचा मृत्यू, दोन दाव्यांमुळे प्रकरणाला वेगळं वळण
विसर्जन मिरवणुकीत मंडळ अध्यक्षाचा मृत्यू

अहिल्यानगर जवळील भिंगार शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. शुल्केश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष दीपर वागस्कर यांचा मिरवणुकीत मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला होता. याच मृत्यूवरुन दोन वेगवेगळे दावे सध्या केले जात आहेत. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, काल मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यामध्ये वागस्कर यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच त्यांचा जीव गेला, असे मंडळाचे म्हणणे आहे.दुसरीकडे पोलीस प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

हेही वाचा-Sahil Wakode Case: परीक्षा हॉलमध्ये साहिलच्या खिशात काय होतं? CCTVमध्ये प्राध्यापकांची विचारणा कैद; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वागस्कर यांना मिरवणुकीत अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळेल. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. लाठीचार्जचा आणि मृत्यूचा संबंध नसल्याचा दावा पोलिलस करत आहेत. या प्रकरणी अजूनही रुग्णालय किंवा पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. नेमके कारण काय, याचा तपास सुरु आहे. या घडलेल्या घटनेनंतर शहरात संतापाची लाट उसळली आहे. आमदार संग्राम जगताप, हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्व गणेश मंडळांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. या प्रकरणात दोषी असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई होईपर्यंत गणेश विसर्जन हे स्थगित ठेवले जाईल, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निषेधार्थ आज भिंगार शहर बंद ठेवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number