Pune PMPML Bus Cancel : खासगी गाड्यांना बंदी, पीएमपीच्या अडीच हजार फेऱ्या रद्द…पुण्याच्या ‘ग्रँड चॅलेंज’चा सर्वसामान्यांना मनस्ताप

याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला असून, पीएमपीएलच्या (PMPML) तब्बल 2500 फेऱ्या रद्द झाल्या आहेत.

Pune PMPML Bus Cancel : खासगी गाड्यांना बंदी, पीएमपीच्या अडीच हजार फेऱ्या रद्द…पुण्याच्या ‘ग्रँड चॅलेंज’चा सर्वसामान्यांना मनस्ताप

Pune PMP Bus Cancel : 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीमुळे शहरातील प्रमुख रस्ते सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक वाहतुकीला बसला असून, पीएमपीएलच्या (PMPML) तब्बल 2500 फेऱ्या रद्द झाल्या आहेत, तर 150 हून अधिक बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

हे प्रमुख रस्ते राहणार 'नो एन्ट्री' झोन 

सायकल शर्यतीच्या 'प्रोलॉग' फेरीसाठी मध्य पुण्यातील महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालय (FC) रस्ता, जंगली महाराज (JM) रस्ता आणि विद्यापीठ रस्ता यांचा समावेश असून, खंडुजीबाबा चौक, गुडलक चौक, बालगंधर्व चौक, संचेती चौक आणि सिमला ऑफिस चौक या परिसरात खासगी वाहनांनाही पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे डेक्कन बस स्थानक हे मुख्य स्थानक आज दिवसभर बंद राहणार आहे.

हेही वाचा – Pune News : पुणे-सातारा मार्गावरील प्रवास सुस्साट! दुहेरी बोगदा.. 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांवर, कुठून-कसा आहे नवा मार्ग?

प्रवाशांचा खोळंबा: नोकरदार आणि विद्यार्थ्यांचे हाल 

आज कामकाजाचा दिवस असल्याने जंगली महाराज आणि एफसी रोडवरील कार्यालयांमध्ये जाणाऱ्या नोकरदारांची मोठी गैरसोय होत आहे. पुण्यातून पिंपरीकडे जाणाऱ्या बस आता पुणे स्टेशन किंवा सेनापती बापट मार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर कर्वे रस्त्यावरून येणाऱ्या बस केवळ डेक्कन कॉर्नरपर्यंतच धावतील. यामुळे प्रवाशांना आपल्या नियोजित स्थळी पोहोचण्यासाठी लांबचा वळसा घालावा लागत आहे.

सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त 

ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. एकूण 4 अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली दीड हजार (1500) पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. देखरेखीसाठी 'दृष्टी' हे सर्व्हिलन्स व्हेइकल आणि शीघ्र कृती दल (QRC) तैनात करण्यात आले आहे.

हेही वाचा – Nanded-Pune Express: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, 'या' कारणामुळे पुणे जंक्शनऐवजी आता 'हडपसर'लाच उतरवावे लागणार

नाट्यप्रेमींनाही फटका: प्रयोगांच्या वेळेत बदल 

वाहतूक कोंडी आणि रस्तेबंदीमुळे पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता) येथे सुरू असलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सांगली, अकोला आणि नागपूरच्या संघांचे दुपारचे प्रयोग रद्द करण्यात आले असून, रस्ते खुले झाल्यानंतर म्हणजेच सायंकाळी 6:30 नंतर हे प्रयोग पार पडतील.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number