LPG Crisis: 5 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी मिळणार प्राधान्य; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

आता 5 किलोच्या सिलिंडर्सच्या वाटपामध्ये स्थलांतरित कामगारांना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

LPG Crisis: 5 किलोच्या गॅस सिलिंडरसाठी मिळणार प्राधान्य; LPG टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

LPG Crisis: मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन संकटानंतर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि विशेषतः कामगार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. आता 5 किलोच्या सिलिंडर्सच्या वाटपामध्ये स्थलांतरित कामगारांना प्राधान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच, व्यावसायिक LPG पुरवठ्यातील अतिरिक्त 50 टक्के वाटा राज्यांना देण्याची घोषणा पेट्रोलियम मंत्रालयाने सोमवारी केली.

LPG च्या 'पॅनिक बुकिंग'मध्ये मोठी घट
पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी माहिती दिली की, गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सुरू असलेली गॅस सिलिंडरच्या घाईघाईने बुकिंगची (Panic Booking) लाट आता ओसरली आहे. गेल्या 3 आठवड्यांत सुमारे 35 लाख घरगुती आणि व्यावसायिक LPG जोडण्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. वितरकांकडे सध्या साठ्याची कोणतीही कमतरता नसून पुरवठा साखळी पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिक गॅसचा राज्यांना वाढीव पुरवठा
केंद्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यातील 50 टक्के वाटा राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय 21 मार्च रोजी घेतला होता. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा आधार मिळणार आहे. आतापर्यंत सुमारे 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या योजनेअंतर्गत सुमारे 15,800 टन व्यावसायिक LPG चे वाटप पूर्ण केले आहे.

स्थलांतरित कामगार आणि छोट्या उद्योगांना मदत
सरकारने राज्य सरकारांना विशेष सूचना दिल्या आहेत की, व्यावसायिक गॅसचे वाटप करताना 5 किलोच्या 'फ्री ट्रेड LPG' (FTL) सिलिंडर्ससाठी स्थलांतरित कामगारांना प्रथम प्राधान्य द्यावे. याशिवाय, रस्ते कडेचे ढाबे, कम्युनिटी किचन, दुग्धव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया युनिट्सना देखील या पुरवठ्यात झुकते माप दिले जाणार आहे. यामुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक चक्र सुरळीत राहण्यास मदत होईल.

हेही वाचा – LPG Gas Crisis : सरकारचा मोठा निर्णय, घरगुती वापराचा सिलेंडर आता 14.2 किलो नाही तर…

परिस्थिती सध्या सामान्य; साठा पुरेसा
सुजाता शर्मा यांच्या मते, किरकोळ विक्री केंद्रांवरील परिस्थिती आता सामान्य आहे. जरी जागतिक स्तरावर LPG पुरवठ्याबाबत काही चिंता असल्या, तरी भारतातील वितरणाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. वितरकांकडे पुरेसा स्टॉक उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त बुकिंग करू नये, असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number