All Chief Ministers Meeting: पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद; ‘या’ गंभीर विषयावर होणार चर्चा

देशातील राज्यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शुक्रवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

All Chief Ministers Meeting: पंतप्रधान मोदी उद्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद; ‘या’ गंभीर विषयावर होणार चर्चा

All Chief Ministers Meeting: मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, देशातील राज्यांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शुक्रवारी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या संवादामध्ये प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली जाईल. इराणकडून 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' (Strait of Hormuz) या सामरिक जलमार्गावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याने, भारताच्या इंधन पुरवठ्यावर होणारा संभाव्य परिणाम विचारात घेऊन केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय राखण्यावर या बैठकीत भर दिला जाणार आहे.

राज्यांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन 
पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच युद्धाच्या दीर्घकालीन दुष्परिणामांबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी राज्यसभेत बोलताना त्यांनी सर्व राज्यांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले होते. कोविड-19 महामारीच्या काळात ज्याप्रमाणे केंद्र आणि राज्यांनी एकत्रीत लसीकरण आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी समन्वय साधला होता, तशीच सक्रियता आताही दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाची विकासाची गती कायम राखण्यासाठी राज्यांनी सज्ज राहावे, असे निर्देश या बैठकीत दिले जाण्याची शक्यता आहे.

2 महिन्यांसाठी इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध
पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन टंचाई निर्माण होईल, अशा अफवा पसरत असल्या तरी केंद्र सरकारने जनतेला धीर दिला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, भारताकडे पुढील 60 दिवसांसाठी (साधारणपणे 2 महिने) पुरेल इतका कच्च्या तेलाचा (Crude Oil) आणि इंधनाचा साठा सुरक्षित आहे. PIB ने 26 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या पत्रकानुसार, तेल कंपन्यांनी (OMCs) आयातीसाठी आधीच आगाऊ व्यवस्था केली असून पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही, याची खात्री दिली आहे.

हेही वाचा – Covid CICADA Variant : पुन्हा लॉकडाऊनचं संकट? कोव्हिडच्या CICADA व्हॅरिएंटचा अमेरिकेत धुमाकूळ; भारतात नेमकी काय परिस्थिती?

राष्ट्रीय सुरक्षा आणि एकात्मतेवर भर
बुधवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर आता मुख्यमंत्र्यांशी होणारी ही चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि सामूहिक निर्धार आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीत राज्यांना आपापल्या स्तरावर आपत्कालीन नियोजन आणि संसाधनांच्या व्यवस्थापनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number