All CM VC Meeting : हॉर्मुझ संकटावर पंतप्रधानांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; 5 राज्यांच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण

'हॉर्मुझ सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) परिसरात उद्भवलेल्या संकटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारा परिणाम आणि भारताची सज्जता, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

All CM VC Meeting : हॉर्मुझ संकटावर पंतप्रधानांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत तातडीची बैठक; 5 राज्यांच्या अनुपस्थितीने चर्चेला उधाण

All CM VC Meeting : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील मुख्यमंत्र्यांची एक महत्त्वाची बैठक घेतली. ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) परिसरात उद्भवलेल्या संकटामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होणारा परिणाम आणि भारताची सज्जता, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. ऊर्जा पुरवठा, इंधन सुरक्षा आणि राज्यस्तरीय आपत्कालीन योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, निवडणुकांचे वारे वाहत असलेल्या पाच राज्यांचे मुख्यमंत्री आदर्श आचारसंहितेचे कारण देत या बैठकीला अनुपस्थित राहिले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आचारसंहितेचे कारण की राजकीय सबब? अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह
निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला दांडी मारल्याने, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरही राजकारण होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 28 फेब्रुवारीपासून इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या संघर्षामुळे हॉर्मुझ सामुद्रधुनीतील मार्ग विस्कळीत झाला आहे. या जागतिक आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच सर्वपक्षीय बैठक आणि संसदेत निवेदने दिली आहेत. अनुपस्थित राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत आता कॅबिनेट सचिवालय स्वतंत्र बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

देशात इंधनाचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
हॉर्मुझ संकटामुळे देशात इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात असतानाच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित असून सर्व इंधन विक्री केंद्रांवर पुरेसा साठा उपलब्ध आहे. मंत्रालयाने नागरिकांना स्पष्ट शब्दांत आवाहन केले आहे की, चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणाऱ्या घबराटीला बळी पडू नका. इंधन पुरवठा साखळीवर सरकारचे बारीक लक्ष असून कोणतीही टंचाई भासणार नाही, याची ग्वाही देण्यात आली आहे.

हेही वाचा – Russian Oil Import : जागतिक तेल संकटात भारताचा मोठा निर्णय! रशियाकडून 40 टक्के कच्च्या तेलाच्या आयातीचे नियोजन

ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी भारताची नवी रणनीती
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी माहिती दिली की, भारताची ऊर्जा जहाजे हॉर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास करतील, यासाठी भारत जागतिक स्तरावर सर्व देशांच्या संपर्कात आहे. एलपीजीने भरलेली चार जहाजे नुकतीच सुरक्षितपणे भारतात दाखल झाली आहेत. सध्याच्या जागतिक परिस्थितीत 1.4 अब्ज जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आणि एलएनजीची आयात वाढवली आहे, तसेच अमेरिकेकडून सवलत मिळवून आपली पुरवठा साखळी अधिक बळकट केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number