Manipur CM: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात; यमनाम खेमचंद सिंह आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती राजवट उठवल्याची अधिसूचना जारी केल्यानंतर राजभवनात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.<br/>

Manipur CM: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात; यमनाम खेमचंद सिंह आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Manipur CM: ईशान्येकडील मणिपूर राज्यात गेल्या एक वर्षापासून लागू असलेली राष्ट्रपती राजवट बुधवारी (4 फेब्रुवारी 2026) अधिकृतपणे उठवण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा लोकशाही सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते यमनाम खेमचंद सिंह आज संध्याकाळी 6 वाजता मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती राजवट उठवल्याची अधिसूचना जारी केल्यानंतर राजभवनात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

एनडीएचा सत्तास्थापनेचा दावा
भाजप प्रदेशाध्यक्षा ए. शारदा देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय यमनाम खेमचंद सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या शिष्टमंडळाने राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. या शिष्टमंडळात कुकी-बहुल जिल्ह्यांतील दोन आमदारांचाही समावेश होता, जे राज्याच्या स्थिरतेसाठी महत्त्वाचे मानले जात आहेत. मंगळवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत सिंह यांची एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून, तर कुकी समुदायाचे नेमचा किपगेन यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली.

हेही वाचा – Ajit Pawar Plane Crash: बारामती दुर्घटनेत नवा ट्विस्ट, दादांचं विमान कोसळण्याआधी एक जण उडी मारत होता पण…; प्रत्यक्षदर्शीची मिटकरींना माहिती

शांतता आणि विकासाचे नवीन पर्व
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून सुरू झालेल्या मेईतेई आणि कुकी समुदायातील जातीय हिंसाचारात आतापर्यंत किमान 260 लोकांचा बळी गेला आहे, तर हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन सरकारसमोर शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान असेल. शपथविधीनंतर सिंह यांच्यासह पाच आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. "विकसित मणिपूरचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असा विश्वास नवनिर्वाचित मुख्यमंत्री खेमचंद सिंह यांनी व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number