उपचारासाठी गर्भवती डोलीतून रुग्णालयात

गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एकीकडे देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र आहे. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला […]

उपचारासाठी गर्भवती डोलीतून रुग्णालयात

गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा मृत्यू झाला. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी गावातील मरकटवाडी इथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. एकीकडे देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात मूलभूत सोयीसुविधा पोहोचलेल्याच नसल्याचं चित्र आहे. या गावात रस्ता नसल्याने वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करत दवाखाना गाठावा लागला आहे.

मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या बोटशी ग्रामपंचायत येथील मरकटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर होती. वंदना यांना शनिवारी अचानक प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली व महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकाही बोलवण्यात आली. मात्र मुख्य रस्ता ते मरकटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू शकत नव्हती.

दरम्यान महिलेला खूपच वेदना सुरु झाल्याने तिची प्रसूती घरातच झाली व तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला. मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालके कमकुवत होती, महिलेसह बालकांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. पण तसे न झाल्याने काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांचा मृत्यू झाला. रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावल्याने तिच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर कपारीतून ३ किलोमीरवरची पायपीट करत या महिलेला मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने या महिलेला खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number