G-20 Summit: पंतप्रधान मोदींनी लावली जी-20 शिखर परिषदेला उपस्थिती; अनेक जागतिक नेत्यांशी साधला संवाद

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी औपचारिक स्वागत करत विशेष आदरातिथ्य दाखवले.

G-20 Summit: पंतप्रधान मोदींनी लावली जी-20 शिखर परिषदेला उपस्थिती; अनेक जागतिक नेत्यांशी साधला संवाद

G-20 Summit: आफ्रिका खंडात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या G20 शिखर परिषदेला आज भव्य सुरुवात झाली. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते जोहान्सबर्गमधील मुख्य सभागृहात पोहोचताच जागतिक लक्ष या कार्यक्रमाकडे वेधले गेले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी औपचारिक स्वागत करत विशेष आदरातिथ्य दाखवले. तथापी, यावेळी पंतप्रधान मोदींनी अनेक जागतिक नेत्यांशी संवाद साधला. ही परिषद अशा काळात होत आहे जेव्हा जग आर्थिक मंदी, हवामान बदल आणि जागतिक असमानता यांसारख्या गंभीर समस्यांवर एकसंध उपाय शोधत आहे. भारताच्या नेतृत्वाकडे विशेष अपेक्षेने पाहिले जात आहे. प्रोटोकॉलनुसार, परिषदेतील भाषणांचे थेट प्रसारण बंद ठेवण्यात आले आहे आणि अधिकृत व्हिडिओ फीडही म्यूट करण्यात आला आहे.

द्विपक्षीय बैठकींना सुरुवात

पंतप्रधान मोदी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आणि G20 कार्यक्रमापूर्वी भारतीय समुदाय व तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजकांशी सखोल चर्चा केली. शिखर परिषदेदरम्यान जपानचे नवे पंतप्रधान साने ताकाची यांच्याशी होणारी बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. याच प्रवासात मोदी 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या IBSA शिखर परिषदेत (भारत- ब्राझील – दक्षिण आफ्रिका) ही सहभागी होणार आहेत. “एकता, समता आणि शाश्वतता,” अशी G20 परिषदेची यंदाची थीम आहे. 

हेही वाचा – India-China Relations : भारताचा मोठा निर्णय! चिनी पर्यटकांसाठी पर्यटन व्हिसा पुन्हा सुरू

मोदी-मेलोनी भेट चर्चेत

दरम्यान, G20 स्थळीच पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची अनौपचारिक पण महत्त्वपूर्ण भेट घेतली. दोन्ही नेते परस्पर सहकार्य, जागतिक आव्हाने आणि तंत्रज्ञान व व्यापार विषयांवर चर्चा करताना अतिशय सौहार्दपूर्ण दिसले.

भारतीय समुदायाशी संवाद

जोहान्सबर्गमध्ये आगमनानंतर लगेच मोदींनी भारतीय वंशाच्या तंत्रज्ञान उद्योजकांना भेटून फिनटेक, शेती, शिक्षण, हेल्थटेक व सोशल मीडिया या क्षेत्रातील त्यांचे अनुभव जाणून घेतले. त्यांनी भारताशी संबंध आणखी मजबूत करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा – Congress Honors Michelle Bachelet : भारतविरोधकाचा कॉंग्रेसकडून गौरव

ट्रम्प आणि पुतिन गैरहजर  

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन शिखर परिषदेस दूर राहिले असले तरी जागतिक अजेंडा ठरवण्याचे काम सुरू झाले आहे. ट्रम्प यांच्या अनुपस्थितीमागे दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे त्यांचे आरोप कारणीभूत ठरल्याचे म्हटले जाते.

या मुद्द्यांवर होणार सखोल चर्चा

हवामान आपत्तींशी लढणाऱ्या गरीब देशांना मदत वाढवणे, परकीय कर्जमुक्ती देणे आणि हरित ऊर्जेमध्ये सहकार्य वाढवणे यासारख्या मुद्द्यांवर शिखर परिषदेत सहमती होण्याची आशा दक्षिण आफ्रिकेने व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेने हे मुद्दे विकसित देशांसमोर स्पष्टपणे मांडले आहेत. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेवर गोऱ्या लोकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केल्यानंतर अमेरिकेने शिखर परिषदेवर बहिष्कार टाकला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील काही महिने चाललेला राजनैतिक वाद आणखी तीव्र झाला. दक्षिण आफ्रिकेने विकसित देशांसमोर हे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत, अशी माहिती UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number