PM Modi Mumbai Visit Postponed: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलला; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोदींशी चर्चा

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जिथे त्यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर परिस्थिती आणि शेतीस झालेल्या नुकसानीची माहिती दिली.

PM Modi Mumbai Visit Postponed: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलला; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोदींशी चर्चा

PM Modi’s Mumbai Visit Postponed: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मुंबई दौऱ्याचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. आता ते 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करतील. यामध्ये मेट्रो लाईन 3 आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समाविष्ट आहे. दौऱ्यादरम्यान पंतप्रधान फिनटेक परिषदेतही उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या फेरनियोजनाची माहिती दिली आहे. तथापी, नवी मुंबई विमानतळाचे नाव दिवंगत डी. बी. पाटील यांच्या नावावर ठेवण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली, जिथे त्यांनी महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर परिस्थिती आणि शेतीस झालेल्या नुकसानीची माहिती दिली. मोदींनी आश्वासन दिले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात येईल. 

हेही वाचा – Heavy Rainfall in Marathwada : मराठवाडा व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; राज्यभर यलो अलर्ट

दरम्यान, पूरग्रस्तांना मदत करण्याव्यतिरिक्त, चर्चेत महाराष्ट्र संरक्षण कॉरिडॉर, गडचिरोलीतील स्टील उत्पादनासाठी सवलती, व्यवसाय सुलभीकरण उपाय आणि दहिसर येथील भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यातील जमिनीचे हस्तांतरण यासह अनेक प्रमुख विकासात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, गडचिरोलीमध्ये औद्योगिक विकासाची प्रचंड क्षमता असून, येथे स्वस्त आणि किफायतशीर स्टील उत्पादनासाठी मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे. अशा उपक्रमांमुळे केवळ औद्योगिक विकासाला चालना मिळणार नाही तर नक्षलवादी कारवायांनी प्रभावित झालेल्या जिल्ह्याचा कायापालट करण्याच्या संधी निर्माण होतील यावर यावेळी मुख्यमंत्र्यांनी भर दिला.

हेही वाचा – Dharashiv Collector Dance : मराठवाड्यातील शेतकरी संकटात मात्र जिल्हाधिकारी नाचण्यात दंग

याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संरक्षण आणि अवकाश क्षेत्रात महाराष्ट्राच्या मजबूत भूमिकेवर भर दिला. संरक्षण कॉरिडॉर प्रकल्पामुळे राज्यातील 10 आयुध कारखाने आणि 30 टक्के उत्पादन क्षमता असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल. दहिसरमधील 58 एकर जमीन बीएमसीला हस्तांतरित केल्यास नवीन नागरी विकासाच्या संधी खुल्या होतील आणि इमारतींच्या उंचीच्या अडचणी कमी होतील, असंही यावेळी त्यांनी नमूद केलं. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number