Pigeon with Gold Chain : आगळीवेगळी चोरी! चोराने नाही, तर चक्क कबुतराने पळवली लाखमोलाची सोनसाखळी; लोक पाहातच राहिले.. मग..

एका ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचे दागिने घडवण्याचे काम सुरू असताना, अचानक एक कबूतर दुकानात शिरले. काही वेळातच दुकानातून एक सोन्याची साखळी चोचीत घेऊन ते उडाले..

Pigeon with Gold Chain : आगळीवेगळी चोरी! चोराने नाही, तर चक्क कबुतराने पळवली लाखमोलाची सोनसाखळी; लोक पाहातच राहिले.. मग..

Pigeon Steals Gold Chain : सध्या सोशल मीडियावर एक अत्यंत अजब आणि थक्क करणारा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला आहे. एका कबुतराने चक्क सोन्या-चांदीच्या दुकानातून लाखमोलाची सोनसाखळी चोरून नेली आणि ती गळ्यात घालून ते मिरवू लागले. सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असताना कबुतराला अशा पद्धतीने साखळी नेताना पाहून दुकानदाराच्या तोंडचे पाणीच पळाले. सर्वांनी या कबुतराकडून साखळी परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, या 'श्रीमंतांचे शौक' असलेल्या कबुतराची चर्चा आता संपूर्ण देशभरात रंगली आहे.

ज्वेलरी शॉपमध्ये कबुतराची 'एन्ट्री' आणि सर्वांनाच धक्का
ही घटना राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील डेगाना कसब्यातील एका सराफा बाजारात घडली. एका ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचे दागिने घडवण्याचे काम सुरू असताना, अचानक एक कबूतर दुकानात शिरले. कारागिराचे लक्ष विचलित होताच, या कबुतराने काउंटरवर ठेवलेली आणि नुकतीच तयार झालेली सोन्याची महागडी चेन आपल्या चोचीत पकडली आणि फुर्रकन उडाला. सोन्यासारखी मौल्यवान वस्तू अशा प्रकारे उडून जाताना पाहून दुकानदार आणि तिथे उपस्थित असलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

गळ्यात घातली चेन अन् पाहणारे पडले बुचकळ्यात
दुकानातून बाहेर पडल्यानंतर हे कबूतर समोरच एका ठिकाणी जाऊन बसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने चोचीतली ती सोनसाखळी खाली न पाडता कौशल्याने आपल्या गळ्यात अडकवून घेतली. हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक थक्क झाले. लाखांची चेन गळ्यात घालून बसलेल्या या 'हुशार' कबुतराचा व्हिडिओ तिथे असलेल्या लोकांनी मोबाईलमध्ये कैद केला. व्यापारी मात्र आपली मौल्यवान साखळी परत कशी मिळवायची, या चिंतेत होता आणि कबुतरावर नजर ठेवून होता.

हेही वाचा – Fake Death Case: धक्कादायक! खटल्यापासून वाचण्यासाठी स्वतःला मृत घोषित केलं, पण 12 वर्षांनी उघड पडलं पितळ; काय आहे प्रकरण?

तासाभराची मेहनत आणि साखळी पुन्हा हस्तगत
बराच वेळ कबुतराला खाली उतरवण्याचे आणि त्याला पकडण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांनी केले. अखेर बऱ्याच वेळानंतर कबुतराने ती साखळी तिथेच खाली टाकली आणि ते उडून गेले. लाखाची सोनसाखळी सुखरूप परत मिळाल्यावर दुकानदाराने सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना डेगाना परिसरात दिवसभर चर्चेचा विषय ठरली होती. "नशीब बलवत्तर म्हणून सोनं मिळालं, नाहीतर कबुतराने लाखांचा गंडा घातलाच होता," अशी चर्चा व्यापारी वर्गात सुरू होती.

सोशल मीडियावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युझर्सनी मजेशीर कमेंट्स सुरू केल्या आहेत. एकाने लिहिले की, "कदाचित व्हॅलेंटाईन डे साठी कबूतर आपल्या 'गर्लफ्रेंड'ला गिफ्ट नेऊन देत असेल," तर दुसऱ्याने म्हटले, "हे आधुनिक काळातील कबूतर आहे, आता हे पत्र नाही तर सोन्याचे दागिने पोहोचवतेय." एका युझरने तर गंमतीने विचारले, "हे कबूतर मला मिळेल का?" एकूणच या घटनेने नागौरमध्ये मनोरंजनासोबतच आश्चर्याचा धक्काही दिला आहे.

हेही वाचा – Thief Files Complaint : ऐकावं ते नवलचं! चोरी करायला गेलेल्या चोराचीच पोलिसांत धाव; मारहाण करणाऱ्यांविरुद्ध दाखल केला FIR

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number