‘खरा मुख्यमंत्री कोण आहेत हे जनतेला माहित आहे’

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरु झाले, यावेळी विधीमंडळाबाहेर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना गद्दार त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांचे गेम त्यांनी कसा केला हे सर्वांना माहित आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला, मात्र त्यात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे, दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत गेलेले अपक्षांना कुठेही स्थान नाही, चांगलं काम करणाऱ्या महिलांना स्थान मिळाले […]

‘खरा मुख्यमंत्री कोण आहेत हे जनतेला माहित आहे’

आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरु झाले, यावेळी विधीमंडळाबाहेर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना गद्दार त्यांच्यासोबत गेले आहेत त्यांचे गेम त्यांनी कसा केला हे सर्वांना माहित आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाला, मात्र त्यात खरा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे, दुसरं म्हणजे त्यांच्यासोबत गेलेले अपक्षांना कुठेही स्थान नाही, चांगलं काम करणाऱ्या महिलांना स्थान मिळाले नाही. मुंबईकरांना स्थान मिळाले नाही. ना मुंबईचा आवाज ऐकला ना महिलांचा आवाज ऐकला. ना अपक्षांचा कुठे त्यात आवाज आहे. त्यांच्यासोबत सर्वप्रथम १४-१५ जण जे निष्ठावंत गेले, त्यांनाही स्थान दिलं नाही. त्यामुळे पुन्हा दाखवून दिले की, निष्ठेला त्यांच्या मनात कुठेही स्थान नाही अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे फडणीस सरकारवर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी पुन्हा बंडखोर नेत्यांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले मात्र त्यांच्यासमोर एक अट ठेवली आहे, आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्या निष्ठावंतांना स्थान दिलं आहे त्यांनाही कमी लेखलं जात आहे. आमच्याकडे बरे होते असं झालं आहे. त्या नेत्यांशी संपर्क सतत असतो, मात्र तिथे जाऊन ते अडकले, फसले आहेत, नजरकैदेत आहेत. त्यांच्या मनात सतत विचार येत असतील की, आता आमच्यासाठी दरवाजे खुले आहेत का? त्यांना मी सांगू इच्छितो, दरवाजे अद्यापही खुले आहेत. पण ज्यांना तिथे राहायचं असेल त्यांनी आमदाराकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. अशी अट आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना घातली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number