ST Bus Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागला; 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह आता प्रवाशांवर ‘या’ कराचाही बोजा

सुट्ट्यांमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्के हंगामी वाढ जाहीर केली आहे.

ST Bus Fare Hike: प्रवाशांच्या खिशाला कात्री, ST चा प्रवास महागला; 10 टक्के हंगामी भाडेवाढीसह आता प्रवाशांवर ‘या’ कराचाही बोजा

ST Bus Fare Hike : उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे नियोजन करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाने मोठा आर्थिक धक्का दिला आहे. सुट्ट्यांमधील वाढत्या गर्दीचा फायदा घेत महामंडळाने प्रवासी भाड्यात 10 टक्के हंगामी वाढ जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, केवळ मूळ भाड्यात वाढ करून महामंडळ थांबलेले नाही, तर आता प्रत्येक तिकिटावर 2 रुपये अतिरिक्त 'स्वच्छता अधिभार' (Cess) देखील वसूल केला जाणार आहे. बुधवारपासून ही दरवाढ लागू झाल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

15 जूनपर्यंत दरवाढ कायम राहणार
एसटी प्रशासनाने घेतलेला हा हंगामी दरवाढीचा निर्णय 15 जून 2026 पर्यंत कायम राहणार आहे. या निर्णयाची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
कालावधी: 15 एप्रिल ते 15 जून 2026.
वाढीचे प्रमाण: मूळ भाड्यावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क.
अतिरिक्त भार: प्रत्येक तिकिटामागे 2 रुपये स्वच्छता शुल्क.

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर यांसारख्या प्रमुख बसस्थानकांवरून उन्हाळी सुट्टीत लांब पल्ल्याच्या गाड्यांना मोठी गर्दी असते. देवदर्शन, पर्यटन किंवा लग्नसराईसाठी कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेला आता एसटीच्या या 'हंगामी' निर्णयामुळे प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत, ज्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Amit Thackeray: पोलिसांना फ्री हँड द्यावा, मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

भाडेवाढीचे समर्थन आणि प्रवाशांचे प्रश्न
एसटी महामंडळाच्या मते, इंधनाचे वाढते दर, गाड्यांचा देखभाल खर्च आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ही दरवाढ अनिवार्य आहे. गेल्या दिवाळीत भाडेवाढ टाळल्यामुळे झालेल्या महसुली तुटीची भरपाई करण्यासाठी हा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. मात्र, "स्वच्छतेच्या नावाखाली 2 रुपये अतिरिक्त घेतले जात असूनही बसेसची दुरवस्था आणि अस्वच्छता कायम आहे," अशी टीका प्रवाशांकडून होत आहे.  
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number