सगळीकडून नकारचं; गडाच्या पायथ्याशीच करावा लागणार पंकजा मुंडेंना दसरा मेळावा

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर   अहमदनगरच्या भगवानगडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.   गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बुधवारी पंकजा मुंडे यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आता प्रशासनाने दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली.   त्यामुळे यंदाही दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशीच होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या […]

सगळीकडून नकारचं; गडाच्या पायथ्याशीच करावा लागणार पंकजा मुंडेंना दसरा मेळावा

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

अहमदनगरच्या भगवानगडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दसरा मेळाव्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे.

 

गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी बुधवारी पंकजा मुंडे यांच्या पत्राला प्रतिसाद दिला नव्हता. त्यानंतर आता प्रशासनाने दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली.

 

त्यामुळे यंदाही दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशीच होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली नाही.

 

पंकजा मुंडे यांनी नामदेव शास्त्रींना पत्र  लिहून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती.  पण, आता सगळीकडून नकार आल्यामुळे पंकजा मुंडेंना गडाच्या पायथ्याशीच दसरा मेळावा करावा लागणार आहे, असे दिसून येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number