Pakistani Beggars Deports: जगात नाचक्की! ‘धुरंधर’वर बंदी घालणाऱ्या देशाने 24 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलवले

सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत या आखाती देशांनी त्यांच्या देशात 'धुरंधर' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मात्र, हेच देश त्यांच्या देशात येऊन भीक मागणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना हाकलून देत आहेत.

Pakistani Beggars Deports:  जगात नाचक्की!  ‘धुरंधर’वर बंदी घालणाऱ्या देशाने 24 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलवले

Pakistani Beggars Deported by Saudi Arabia : बॉलीवूडच्या 'धुरंधर' चित्रपटात पाकिस्तानविरोधी चित्रण असल्याचा आरोप करत सौदी अरेबिया, युएई आणि कुवेत सारख्या आखाती देशांनी प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मात्र, या देशांचा पाकिस्तानला असलेला हा पाठिंबा केवळ तांत्रिक असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात, पाकिस्तानातून येणाऱ्या भिकारी आणि गुन्हेगारांच्या वाढत्या संख्येमुळे हेच मुस्लीम देश आता पाकिस्तानवर नाराज आहेत. देशामध्ये येऊन भीक मागणाऱ्या तब्बल 24,000 पाकिस्तानी नागरिकांना सौदी अरेबियाने देशाबाहेर काढले असून, यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

पर्यटक आणि धार्मिक व्हिसाचा गैरवापर
पाकिस्तानचे नागरिक हज आणि उमराह यात्रेसाठी मिळणाऱ्या धार्मिक व्हिसाचा तसेच पर्यटक व्हिसाचा सर्रास गैरवापर करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 'डॉन' या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, परदेशात भीक मागताना अटक होणाऱ्या लोकांपैकी 90 टक्के लोक हे पाकिस्तानी नागरिक आहेत. ही परिस्थिती केवळ आखाती देशांपुरती मर्यादित नसून, आता जपान आणि युरोपीय देशांमध्येही हीच समस्या भेडसावत आहे. सौदी अरेबियाने 24,000 लोकांना हद्दपार केल्यानंतर, दुबईने 6,000 आणि अझरबैजानने 2,500 पाकिस्तानी भिकाऱ्यांना मायदेशी परत पाठवले आहे.

विमानतळांवर 'भिकाऱ्यांची निर्यात' रोखण्यासाठी मोठी कारवाई
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) दिलेल्या आकडेवारीनुसार, 2025 मध्ये बेकायदेशीर स्थलांतर आणि भिकाऱ्यांची निर्यात रोखण्यासाठी 66,154 प्रवाशांना विविध विमानतळांवर विमानात चढण्यापासून रोखण्यात आले. FIA चे महासंचालक रिफत मुख्तार यांनी स्पष्ट केले की, हे लोक पर्यटन व्हिसावर थायलंड, कंबोडिया आणि आफ्रिकी देशांत जाऊनही भीक मागताना आढळले आहेत. यामुळे पाकिस्तानची प्रतिष्ठा रसातळाला गेली असून, सामान्य पाकिस्तानी प्रवाशांनाही आता जगभरात संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. तसेच, भिकाऱ्यांच्या येण्यासोबतच त्यांच्याकडून इतरही गुन्हेगारी घडत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Donald Trump: गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनाचा कडक निर्णय; ग्रीन कार्ड लॉटरी स्थगित

'भारत चंद्रावर आणि आम्ही भीक मागण्यात व्यस्त'
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव झुल्फिकार हैदर यांनी संसदेच्या स्थायी समितीसमोर बोलताना आपली हतबलता व्यक्त केली. "भारत चंद्रावर पोहोचला आहे, पण आम्ही अजूनही रोजच्या जगण्याच्या संघर्षात अडकलो आहोत," अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानच्या दुरवस्थेवर बोट ठेवले. धार्मिक यात्रेच्या कारणाने सौदी, इराण आणि इराक येथे गेलेले लोक तिथे पोहोचताच भीक मागू लागतात, ज्यामुळे तेथे मानवी तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे संयुक्त अरब अमिरातीने (UAE) डिसेंबर 2022 पासून पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर कडक निर्बंध लादले आहेत.

आखाती देशांची दुटप्पी भूमिका?
एकीकडे 'धुरंधर' सारख्या चित्रपटांना विरोध करून पाकिस्तानच्या बाजूने भावना दाखवणारे आखाती देश, दुसरीकडे मात्र पाकिस्तानी नागरिकांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर व्हिसा बंदी घालत आहेत. कुवेत, ओमान, कतार आणि बहरीन या देशांमध्येही पाकिस्तानी भिकाऱ्यांनी उच्छाद मांडल्याचा आरोप होत आहे. स्वतःच्या देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि वाढती बेरोजगारी यामुळे पाकिस्तानी जनता जगभर पसरू लागली असली, तरी तिथेही भीक मागण्यामुळे त्यांची आणि त्यांच्या देशाची नाचक्कीच होत आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पाकिस्तान आता जागतिक स्तरावर एक 'भिकाऱ्यांचा देश' म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.

हेही वाचा – Violence In Bangladesh: बांग्लादेशामध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडली; हादीच्या मृत्यूनंतर हिंसक उद्रेक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number