ऑपरेशन सिंदूरविरुद्ध पाकिस्तानने सुरू केले ‘बुन्यान अल मारसूस’ ऑपरेशन; काय आहे त्याचा अर्थ? जाणून घ्या?

भारताताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आता पाकिस्तानने भारताविरोधात 'बुन्यान अल मारसूस' ऑपरेशन सुरू केले आहेत. हा एक अरबी शब्द आहे.

ऑपरेशन सिंदूरविरुद्ध पाकिस्तानने सुरू केले ‘बुन्यान अल मारसूस’ ऑपरेशन; काय आहे त्याचा अर्थ? जाणून घ्या?
Edited Image

इस्लामाबाद: शुक्रवारी रात्रीपासून पाकिस्तानी सैन्य भारतीय लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले करत आहे. तथापि, भारतीय सैन्य या हल्ल्यांना योग्य उत्तर देत आहे. दरम्यान, भारताताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. आता पाकिस्तानने भारताविरोधात 'बुन्यान अल मारसूस' ऑपरेशन सुरू केले आहेत. हा एक अरबी शब्द आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक धाडसाला भारतीय लष्कर चोख प्रत्युत्तर देत आहे.

भारताची हवाई संरक्षण प्रणाली पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला उद्ध्वस्त करत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून भारत-पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारताची हवाई संरक्षण प्रणाली कशा प्रकारे काम करत आहे, याचा परिचय आता संपूर्ण जगाला झाला आहे. 

हेही वाचा – माझा वाढदिवस साजरा करू नका त्याऐवजी भारतीय सैन्यांचे मनोबल वाढवा; प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

पाकिस्तानचे फतेह-1 क्षेपणास्त्र नष्ट – 

शनिवारी सकाळी लष्कराने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करून पाकिस्तानचे 4 एअरबेस उद्ध्वस्त केले. यापूर्वी शुक्रवारी रात्री 8:30 नंतर पाकिस्तानने 4 राज्यातील 26 शहरांवर ड्रोनने हल्ला केला. श्रीनगर विमानतळावरही हल्ला झाला हो, जो भारताने हाणून पाडला. पाकिस्तानने फतेह-1 क्षेपणास्त्राने भारतावर हल्ला केला होता. परंतु, भारताने हा हल्ला हाणून पाडला. 

हेही वाचा – मोठी बातमी! भारतातील 24 विमानतळ 15 मे पर्यंत बंद

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आज दुपारी 12 वाजेपर्यंत आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद केले आहे. भारताच्या S-400, L-70 आणि ZU-23 आणि शकिलका सारख्या हवाई संरक्षण प्रणालींद्वारे पाकिस्तानची क्षेपणास्त्रे सतत नष्ट केली जात आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number