पहलगाम हल्ल्याबाबत मोठी बातमी! दहशतवाद्यांनी आठवड्यापूर्वी केली होती अनेक पर्यटन स्थळांची रेकी

दहशतवाद्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वी अनेक पर्यटन स्थळांची रेकी केली होती. रेकी केल्यानंतरच दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बैसरन व्हॅली निवडली.

पहलगाम हल्ल्याबाबत मोठी बातमी! दहशतवाद्यांनी आठवड्यापूर्वी केली होती अनेक पर्यटन स्थळांची रेकी
Edited Image

श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या एक आठवड्यापूर्वी अनेक पर्यटन स्थळांची रेकी केली होती. रेकी केल्यानंतरच दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी बैसरन व्हॅली निवडली. हे ठिकाण पहलगाम शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. पहलगामला 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणूनही ओळखले जाते. 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:45 वाजता पर्यटकांना लक्ष्य करून हा दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. 

हेही वाचा –  पाकिस्तानची उडाली धांदल! सीमेवरील चौक्या केल्या रिकाम्या

पहलगाम दहशतवादी हल्ला 

22 एप्रिल 2025 रोजी दुपारी अनंतनाग जिल्ह्यातील बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाशी संबंधित दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने घेतली. सुरुवातीला दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला. महिला आणि मुलांना बाजूला ढकलण्यात आले आणि पुरूषांना गोळ्या घालण्यात आल्या. दहशतवाद्यांनी पुरूषांना त्यांची पँट काढायला लावली आणि नंतर त्यांचे गुप्तांग तपासले. धर्माची पुष्टी केल्यानंतर दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केलं.

हेही वाचा –   लॉरेन्स बिश्नोई गँगची पाकिस्तानला धमकी

दरम्यान, हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी लष्करासारखा गणवेश परिधान केला होता. त्यांच्याकडे AK-47, M4 कार्बाइन रायफल आणि स्टील-टिप्ड चिलखत-भेदक गोळ्या होत्या. काही दहशतवाद्यांनी बॉडी कॅमेरेही घातले होते. दहशतवाद्यांनी लोकांना कलमा म्हणण्यास सांगितले. जे गैर-मुस्लिम असल्याचे आढळून आले त्यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आलं. दहशतवाद्यांनी सुमारे 15 मिनिटे गोळीबार केला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number