Oracle New CFO : अबब! ‘या’ महिलेला दिलं 215 कोटींचं पॅकेज; 12 हजार भारतीयांची कपात करणाऱ्या कंपनीने केली नवीन CFO ची नियुक्ती

'ओरॅकल'ने नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीने जगभरातून 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहेत.

Oracle New CFO : अबब! ‘या’ महिलेला दिलं 215 कोटींचं पॅकेज; 12 हजार भारतीयांची कपात करणाऱ्या कंपनीने केली नवीन CFO ची नियुक्ती

Oracle New CFO: जगातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या 'ओरॅकल'ने (Oracle) हिलरी मॅक्सन यांची नवीन मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, ही नियुक्ती अशा वेळी झाली आहे जेव्हा कंपनीने जगभरातून 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असून, त्यात भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मॅक्सन यांना देण्यात आलेले कोट्यवधींचे वेतन पॅकेज आणि दुसरीकडे झालेली मोठी कर्मचारी कपात, यामुळे कॉर्पोरेट जगतात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

29 कोटींचा पगार आणि 215 कोटींचे शेअर्स
हिलरी मॅक्सन यांचे वेतन पॅकेज थक्क करणारे आहे. त्यांना वार्षिक 9,50,000 डॉलर्स (सुमारे 7.8 कोटी रुपये) इतका मूळ पगार मिळणार आहे. याव्यतिरिक्त, कामगिरीवर आधारित 20.75 कोटी रुपयांचा बोनस आणि 26 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 215 ते 216 कोटी रुपये) मूल्याची 'इक्विटी' (शेअर्स) त्यांना मंजूर करण्यात आली आहे. सर्व भत्ते आणि बोनस पकडल्यास त्यांचे वार्षिक उत्पन्न 29 कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकते. 6 एप्रिल 2026 रोजी त्यांनी आपला पदभार स्वीकारला असून त्या थेट सीईओ सफ्रा कॅट्झ यांना रिपोर्ट करतील.

कोण आहेत हिलरी मॅक्सन?
मॅक्सन यांनी प्रसिद्ध कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले आहे. ओरॅकलमध्ये येण्यापूर्वी त्या 'श्नाइडर इलेक्ट्रिक'मध्ये ग्रुप सीएफओ म्हणून कार्यरत होत्या. श्नाइडर इलेक्ट्रिक ही 45 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल असलेली जागतिक कंपनी आहे. त्याव्यतिरिक्त, मॅक्सन या 'अँग्लो अमेरिकन पीएलसी'मध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि ऑडिट कमिटीच्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांचा दांडगा अनुभव पाहता, ओरॅकलच्या क्लाउड आणि एआय (AI) क्षेत्रातील विस्तारासाठी त्यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

हेही वाचा – Israel Warns Iran: आज रात्री नऊ वाजताची 'डेडलाईन'; इराणमध्ये महाप्रलय की आणखीन काही वेगळं?, इस्रायलचा रेल्वे प्रवासाबाबत गंभीर इशारा

मोठी कर्मचारी कपात आणि खर्चात फेररचना
गेल्या काही महिन्यांत ओरॅकलने खर्चात कपात करण्यासाठी आपल्या रचनेत मोठे बदल केले आहेत. या अंतर्गत जगभरातून 30,000 नोकऱ्या कमी करण्यात आल्या, ज्यामध्ये भारतातील 12,000 कर्मचाऱ्यांचा बळी गेला. कंपनी आता क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. भविष्यकालीन वाढीसाठी एका बाजूला कपात आणि दुसऱ्या बाजूला उच्च-स्तरीय पदांवर मोठी गुंतवणूक, असे ओरॅकलचे सध्याचे धोरण असल्याचे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number