Paddy Scam : बापरे! उंदरांनी खाल्ले 8 कोटींचे तांदूळ? ‘या’ राज्यातील सरकारी गोदामातून 26,000 क्विंटल तांदूळ गायब

जिल्ह्यातील दोन सरकारी धान खरेदी केंद्रांमधून तब्बल 26,000 क्विंटल धान गायब झाले असून, त्याची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये आहे.

Paddy Scam : बापरे! उंदरांनी खाल्ले 8 कोटींचे तांदूळ? ‘या’ राज्यातील सरकारी गोदामातून 26,000 क्विंटल तांदूळ गायब

Paddy Scam : छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यातून सरकारी व्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील दोन सरकारी धान खरेदी केंद्रांमधून तब्बल 26,000 क्विंटल धान गायब झाले असून, त्याची किंमत अंदाजे 8 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, या महाघोटाळ्याचे खापर चक्क उंदीर, वाळवी आणि कीटकांवर फोडण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नेमका प्रकार काय?

2024-25 च्या हंगामात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान चारभट्टा आणि बघरा या केंद्रांवर साठवण्यात आले होते. तपासात असे दिसून आले की, चारभट्टा केंद्रातून सर्वाधिक धान गायब आहे. येथील केंद्र प्रभारी प्रीतेश पांडे यांच्यावर 5 कोटींच्या अपहाराचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये धानाची आवक खोटी दाखवणे, बनावट बिले सादर करणे आणि सत्य लपवण्यासाठी महत्त्वाच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद करणे असे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.

हेही वाचा – MRP Violation: 20 रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी जास्त पैसे आकारले…; रेस्टॉरंटला मोठा भुर्दंड, ग्राहक आयोगाची कारवाई

अधिकाऱ्याचा अजब दावा

जिल्हा मार्केटिंग अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी केंद्र प्रभारीला पदावरून हटवले असले तरी, धान गायब होण्याचे कारण मात्र अजब दिले आहे. 'धान उघड्यावर साठवले होते, त्यामुळे उंदीर आणि वाळवीने त्याचे नुकसान केले,' असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, 8 कोटींचे धान उंदीर कसे काय खाऊ शकतात? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

काँग्रेसचे आंदोलन

हा घोटाळा समोर येताच राजकारण तापले आहे. काँग्रेस पक्षाने या घटनेचा निषेध करत मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उंदीर सापळे घेऊन आंदोलने केली. जर उंदरांनी 8 कोटींचे धान खाल्ले असेल, तर आधी त्या उंदरांना अटक करा,' असा टोला काँग्रेस नेत्यांनी लगावला. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाला असून दोषींना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Viral Story : उंदीर मारण्याचं औषध मागवलं…पण डिलीव्हरी बॉयच्या 'या' कृत्यामुळे वाचला महिलेचा जीव

चौकशीचे आदेश

सहाय्यक जिल्हा अन्न अधिकारी मदन साहू यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपांमध्ये तथ्य आढळले आहे. 23 मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आली असून, अंतिम अहवालानंतर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number