LPG Cylinder Booking : गॅस बुकिंगसाठी आता एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही; WhatsApp सह ‘या’ 4 सोप्या पद्धतींनी बुक करा सिलेंडर

आता तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही घरबसल्या केवळ एका मेसेजवर किंवा मिस्ड कॉलवरही गॅस बुक करू शकता. जाणून घ्या सिलेंडर बुकिंगचे 4 स्मार्ट मार्ग आणि तक्रार करण्याची पद्धत.<br/>

LPG Cylinder Booking : गॅस बुकिंगसाठी आता एजन्सीमध्ये जाण्याची गरज नाही; WhatsApp सह ‘या’ 4 सोप्या पद्धतींनी बुक करा सिलेंडर

LPG Cylinder Booking : गॅस सिलेंडर बुक करताना फोन कॉल लागत नाहीये? किंवा एजन्सीच्या फेऱ्या मारून तुम्ही त्रस्त झाला आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या अनेक ग्राहकांना कॉलवर सिलेंडर बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या युगात तुम्ही घरबसल्या केवळ एका मेसेजवर किंवा मिस्ड कॉलवरही गॅस बुक करू शकता. जाणून घ्या सिलेंडर बुकिंगचे 4 स्मार्ट मार्ग आणि तक्रार करण्याची पद्धत.

1. WhatsApp बुकिंग: मेसेज करा अन् सिलेंडर मिळवा
तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून संबंधित कंपनीच्या अधिकृत नंबरवर फक्त एक मेसेज पाठवून तुम्ही बुकिंग करू शकता:
Indane Gas: 7588888824 या नंबरवर 'REFILL' असा मेसेज पाठवा.
HP Gas: 9222201122 या नंबरवर 'Hi' किंवा 'Book' लिहून पाठवा.
Bharat Gas: 1800224344 या नंबरवर 'Hi' किंवा 'Book' असा मेसेज करा.

2. मिस्ड कॉलने बुकिंग 
कॉल करण्यासाठी बॅलन्स नसेल तरी काळजी नको, फक्त एक मिस्ड कॉल पुरेसा आहे:
Indane Gas: 8454955555
HP Gas: 9493602222

3. SMS आणि मोबाईल ॲप्सचा वापर
SMS सुविधा: इंडेनसाठी 7718955555 वर तर भारत गॅससाठी 7715012345 वर एसएमएस पाठवून बुकिंग करता येईल.
पेमेंट ॲप्स: आता PhonePe, Google Pay, Paytm आणि Amazon Pay वरूनही काही सेकंदात गॅस बुकिंग आणि पेमेंट शक्य आहे. तसेच सरकारी UMANG ॲपचा वापरही तुम्ही करू शकता.

हेही वाचा – LPG Cylinder Expiry Date: सावधान! मुदत संपलेला गॅस सिलेंडर ठरू शकतो जीवघेणा; 'अशी' तपासा एक्सपायरी डेट

4. सिलेंडर वेळेवर मिळाला नाही तर? अशी करा तक्रार
जर बुकिंग करूनही सिलेंडरची डिलिव्हरी मिळाली नाही, तर तुम्ही खालील टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता:
Indane व HP Gas: 1800-2333-555
Bharat Gas: 1800-22-4344
याशिवाय ग्राहक गॅस कंपनीच्या वेबसाईटवर किंवा सोशल मीडिया हँडल्सवर कंपनीला टॅग करून आपली समस्या सांगू शकतात. वरील सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर बुक करू शकता. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number