कोल्हापुरात कत्तलखाने बंद ठेवण्याच्या आदेशाविरोधात सकल मराठा समाज आक्रमक!

कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हे एक समीकरण आहे. पण कोल्हापूरातील कत्तलखाने पुढचे पाच दिवस बंद करण्याचा दंडाधिकारी यांनी आदेश काढल्याने एक नवा वाद समोर आला आहे. काय आहे वाद? 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरातील मटण, चिकन विक्री बंद ठेवण्यात यावी याबाबतचे आदेश दंडाधिकारी यांनी जारी केला. हा आदेश अखिल भारतीय […]

कोल्हापुरात कत्तलखाने बंद ठेवण्याच्या आदेशाविरोधात सकल मराठा समाज आक्रमक!

कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्सा हे एक समीकरण आहे. पण कोल्हापूरातील कत्तलखाने पुढचे पाच दिवस बंद करण्याचा दंडाधिकारी यांनी आदेश काढल्याने एक नवा वाद समोर आला आहे.

काय आहे वाद?

29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरातील मटण, चिकन विक्री बंद ठेवण्यात यावी याबाबतचे आदेश दंडाधिकारी यांनी जारी केला.

हा आदेश अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार जारी करण्यात आल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.

याला आमचा विरोध असून अशा प्रकारचे आदेश आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असाल, तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.

शिवाय परप्रांतीयांच्या मागणीवरून हे असे आदेश निघत असतील तर वेळप्रसंगी या परप्रांतीयांना इथून हकलवून लावा असा दम सुद्धा यावेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number