Nitin Gadkari : गडकरींनी जपली मैत्री! पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उंब्रज उड्डाणपुलासाठी 133 कोटी मंजूर

या पुलासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांनी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केला होता.

Nitin Gadkari : गडकरींनी जपली मैत्री! पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; उंब्रज उड्डाणपुलासाठी 133 कोटी मंजूर

Umbraj Single Pillar Flyover Approved : राजकारणात वैयक्तिक मैत्री आणि जनहिताचा पाठपुरावा पक्षाच्या पलीकडे जाऊन कसा काम करतो, याचे उत्तम उदाहरण कराडमध्ये पाहायला मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील हे दोघेही सध्या सत्तेत नसताना केवळ आपल्या वैयक्तिक संबंधांच्या जोरावर कराडमधील उंब्रज येथील उड्डाणपुलासाठी तब्बल 133 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या विनंतीला मान देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.

उंब्रजची वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र संपणार
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले उंब्रज हे 30 ते 40 गावांची महत्त्वाची बाजारपेठ आहे. शहराच्या मध्यभागातून महामार्ग जात असल्याने शहराचे दोन भाग झाले आहेत. तसेच चिपळूण-पंढरपूर राज्य महामार्गही याच ठिकाणी मिळतो, ज्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले होते. सध्याचा अंडरपास पावसाळ्यात पाण्याने भरत असल्याने नागरिकांचे हाल होत होते. यावर उपाय म्हणून स्थानिक नागरिकांनी 'सिंगल पिलर' (पारदर्शक) उड्डाणपुलाची मागणी केली होती, जी आता पूर्णत्वास जाणार आहे.

पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा
या पुलासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 24 ऑगस्ट 2023 पासून नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि दूरध्वनीद्वारे पाठपुरावा केला होता. त्यांनी स्वतः उंब्रजला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. दुसरीकडे, श्रीनिवास पाटील यांनीही खासदार असताना लोकसभेत या प्रश्नावर आवाज उठवला होता. उंब्रजमधील शाळा, रुग्णालये आणि बँकांची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. या दोन्ही नेत्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन प्रकल्प मार्गी लागला आहे.

हेही वाचा – Pravin Kolape : सांगलीच्या लेकाची गगनभरारी! शेतात मजुरी करणाऱ्या आईच्या कष्टाचं चीज.. प्रवीण कोळपेची IPS साठी निवड

नितीन गडकरींचा सकारात्मक निर्णय आणि निधी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभागाला पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे आदेश दिले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या कामासाठी सुमारे 133.45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गडकरींनी पत्राद्वारे पृथ्वीराज चव्हाण आणि श्रीनिवास पाटील यांना ही आनंदाची बातमी दिली. सत्तेत नसतानाही केवळ जनहितासाठी केलेल्या या पाठपुराव्यामुळे कऱ्हाड आणि उंब्रज परिसरातील नागरिकांनी दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.

उड्डाणपुलाचे वैशिष्ट्य
उंब्रज येथे होणारा हा उड्डाणपूल 'सिंगल पिलर' स्वरूपाचा म्हणजेच पारदर्शक असेल. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होणार नाही आणि खालील बाजूनेही वाहतुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध राहील. या प्रकल्पामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. निधी मंजूर झाल्याबद्दल त्यांनी नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले असून लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे.

हेही वाचा – NA Tax Canceled : गृहनिर्माण संस्थांना मोठा दिलासा! 'एनए' (NA) कर कायमचा रद्द; जाणून घ्या, जुन्या थकबाकीचे काय होणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number