Delhi Blast Case: दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी NIA कडून 7500 पानांचे दोषारोपपत्र दाखल; 10 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश

10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या स्फोटात 11 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाने राजधानीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.<br/>

Delhi Blast Case: दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी NIA कडून 7500 पानांचे दोषारोपपत्र दाखल; 10 दहशतवाद्यांच्या नावांचा समावेश

Delhi Blast Case: राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण कार बॉम्ब स्फोटाप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून NIA ने 10 आरोपींविरुद्ध तब्बल 7,500 पानांचे सविस्तर दोषारोपपत्र (Charge-sheet) पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले आहे. 10 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या या स्फोटात 11 निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या स्फोटाने राजधानीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

'अन्सार गझवत-उल-हिंद'शी संबंधित होते सर्व आरोपी
तपासातून समोर आले आहे की, सर्व आरोपी 'अन्सार गझवत-उल-हिंद' (AGuH) या दहशतवादी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. ही संघटना कुप्रसिद्ध 'अल-कायदा'शी संलग्न आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार पुलवामा येथील डॉ. उमर-उन-नबी हा होता. आश्चर्याची बाब म्हणजे उमर हा फरिदाबादमधील एका प्रतिष्ठित विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होता. मात्र, तपास सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने त्याच्यावरील आरोप रद्द करण्याचा प्रस्ताव NIA ने मांडला आहे.

'ऑपरेशन हेवनली हिंद': लोकशाही उलथवण्याचा कट
दोषारोपपत्रात करण्यात आलेल्या दाव्यानुसार, आरोपींनी 'ऑपरेशन हेवनली हिंद' या सांकेतिक नावाने भारताची लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करून देशात 'शरिया कायदा' लागू करण्याचा कट रचला होता. अफगाणिस्तानला जाण्याचा प्रयत्न फसला तेव्हा या दहशतवाद्यांनी श्रीनगरमध्ये गुप्त बैठक घेऊन ही संघटना पुन्हा सक्रिय केली. तपासादरम्यान 588 साक्षीदारांचे जबाब आणि 200 हून अधिक वस्तू पुराव्या दाखल जप्त करण्यात आल्या आहेत.

रसायनांपासून बनवले 'TATP' स्फोटक आणि ड्रोनचा वापर
NIA ने उघड केले की, हे दहशतवादी केवळ पारंपारिक शस्त्रांचा वापर करत नव्हते, तर ते अत्यंत आधुनिक प्रयोगही करत होते. बाजारात सहज उपलब्ध असलेल्या रसायनांचा वापर करून त्यांनी 'TATP' हे घातक स्फोटक तयार केले होते. आरोपी 'रॉकेट-माउंटेड' आणि 'ड्रोन-माउंटेड' IEDs (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोझिव्ह डिव्हाइसेस) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. त्यांच्याकडून AK-47, क्रिंकोव्ह रायफल्स आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

देशव्यापी जाळे आणि वैज्ञानिक तपास
या प्रकरणाचा तपास जम्मू-काश्मीरपासून महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणापर्यंत पसरला होता. NIA ने 'DNA फिंगरप्रिंटिंग', आवाजाचे विश्लेषण आणि न्यायवैद्यक (Forensic) चाचण्यांच्या आधारे ठोस पुरावे गोळा केले आहेत. दिल्ली पोलिसांनी प्राथमिक तपास केल्यानंतर NIA ने हे प्रकरण हाती घेतले होते.

हेही वाचा – Pune Bhor Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरण! आरोपीची पोलिस कोठडी आज संपणार; आता पुढे काय?

दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश
योग्य वेळी केलेल्या कारवाईमुळे या दहशतवादी गटाचे मोठे जाळे उधळून लावण्यात यश आले आहे. आतापर्यंत 11 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी NIA कडून विविध राज्यांत छापेमारी सुरू आहे. UAPA (बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा) आणि BNS च्या कलमांखाली या आरोपींवर खटला चालवला जाणार आहे. अमीर रशीद मीर, जसीर बिलाल वानी, डॉ. मुजम्मिल शकील, डॉ. आदिल अहमद राथर, डॉ. शाहीन सईद, मुफ्ती इरफान अहमद वागे, शोएब, डॉ. बिलाल नासिर मल्ला आणि यासिर अहमद दार, असे या दोषारोपपत्रातील प्रमुख दहशतवाद्यांची नावं आहेत. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number