Deep Sea Gold Deposit : भारताच्या या मित्र राष्ट्रात सापडला सोन्याचा खजिना! 2 कोटी टनांच्या साठ्याचा लागला शोध; देश मालामाल, पण…

सागरी भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने हा शोध लावला आहे. संशोधकांनी समुद्राच्या तळाशी जाऊन अनेक नमुने पाहिल्यानंतर या बाबीची खात्री झाली. मात्र, सध्या हा सोन्याचा खजिना शोधापुरताच मर्यादित आहे. कारण...

Deep Sea Gold Deposit : भारताच्या या मित्र राष्ट्रात सापडला सोन्याचा खजिना! 2 कोटी टनांच्या साठ्याचा लागला शोध; देश मालामाल, पण…

Deep Sea Gold Mine in New Zealand : जगाचे लक्ष सध्या मध्यपूर्वेतील संघर्षाकडे लागलेले असतानाच, भारताचे मित्र राष्ट्र असलेल्या देशामधून एक विस्मयकारक बातमी समोर आली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या देशाच्या उत्तरेकडील केर्माडेक बेटांपासच्या खोल समुद्रात सोन्याचा अफाट साठा सापडला आहे. हा शोध म्हणजे एखाद्या प्रत्यक्ष 'ट्रेजर हंट'सारखाच ठरला आहे. दक्षिण पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेल्या एका प्रचंड ज्वालामुखीच्या मुखाशी हे सुवर्ण भांडार दडलेले आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, हा साठा साधारण 2 कोटी टन इतका प्रचंड असून त्याची किंमत कित्येक क्वाड्रिलियन डॉलर्सच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

कसा लागला या सुवर्ण खाणीचा शोध?
जियोमार हेल्महोल्ट्झ सेंटर फॉर ओशन रिसर्चच्या डॉ. क्रिश्चियन टिम यांच्या नेतृत्वाखालील सागरी भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाने हा शोध लावला आहे. संशोधकांनी समुद्राच्या तळाशी जाऊन काचेचे 66 नमुने गोळा केले असून, 'कम्युनिकेशन्स अर्थ अँड एन्व्हायर्नमेंट' मॅगझिनमध्ये याबद्दलचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. समुद्राच्या तळाशी मॅग्मामध्ये पाण्याचे मिश्रण वारंवार वितळल्यामुळे ही नैसर्गिक सुवर्णनिर्मिती प्रक्रिया घडत असल्याचे या अभ्यासातून समोर आले आहे. येथील ज्वालामुखीय समूह जणू सोन्याच्या कारखान्याप्रमाणे काम करत आहेत, जे भूगर्भीयदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

हेही वाचा – Rio Olympic Velodrome Fire: रिओ ऑलिम्पिक वेलोड्रोमच्या छताला भीषण आग; 80 जवानांनी शर्थीच्या प्रयत्नानंतर थोडक्यात वाचवला ऐतिहासिक ठेवा

साठा असूनही वापरणे का आहे कठीण?
न्यूझीलंडला जरी ही सोन्याची लॉटरी लागली असली, तरी सध्यातरी या संपत्तीचा वापर करणे त्यांच्यासाठी अशक्य आहे. याचे मुख्य कारण म्हणजे हा साठा समुद्रात अत्यंत खोलवर आणि ज्वालामुखीच्या तळाशी आहे. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देखील इतक्या खोलीवरून हा साठा बाहेर काढणे मानवी कक्षेच्या बाहेर असल्याचे संशोधकांचे मत आहे. पृथ्वीच्या मेंटेलमधील सबडक्टिंग टेक्टोनिक प्लेटमधून बाहेर येणारे पाणी आणि मॅग्मा यांच्या प्रक्रियेतून हे सोनं तयार होत आहे. त्यामुळे हा खजिना न्यूझीलंडच्या हद्दीत असूनही तो केवळ संशोधनाचाच विषय ठरला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम?
जर भविष्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने हे सोनं बाहेर काढण्यात यश आले, तर न्यूझीलंड हे जगातील सर्वात श्रीमंत राष्ट्र ठरू शकते. सध्या शास्त्रज्ञ मेंटेलमधील सोने वितळण्याच्या आणि आकुंचन पावण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेवर अधिक अभ्यास करत आहेत. भारतासाठी आपले मित्र राष्ट्र अशा प्रकारे नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध होणे ही सकारात्मक बाब असली, तरी या सोन्याचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी मानवाला विज्ञानाच्या क्षेत्रात अजून मोठी झेप घ्यावी लागणार आहे. सध्या तरी न्यूझीलंडला या खजिन्यावर फक्त समाधान मानावे लागणार आहे.

हेही वाचा – NASA Orion Mission : अवकाशात 192 कोटींचं टॉयलेट बिघडलं! चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांसमोर विचित्र समस्या; नासाच्या मिशनमध्ये मोठी तांत्रिक अडचण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number