Worli Concert Youth Death: वरळी कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; फॉरेन्सिक अहवालातून समोर आली मोठी माहिती

सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असताना, आता फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षांनी संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे.<br/>

Worli Concert Youth Death: वरळी कॉन्सर्ट मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; फॉरेन्सिक अहवालातून समोर आली मोठी माहिती

Worli Concert Youth Death: मुंबईतील वरळी भागात आयोजित एका प्रसिद्ध संगीत महोत्सवात घडलेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणात वैद्यकीय अहवालातून एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असताना, आता फॉरेन्सिक लॅबच्या निष्कर्षांनी संपूर्ण प्रकरणाला वेगळी दिशा दिली आहे.

वैद्यकीय अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

दरम्यान, एनएससीआय डोम येथे 6 जून रोजी पार पडलेल्या एका आंतरराष्ट्रीय म्युझिक कॉन्सर्टदरम्यान 28 वर्षीय वृषभ महेंद्र गांगुर्डे या तरुणाचा अचानक मृत्यू झाला होता. या प्रकरणी आलेल्या फॉरेन्सिक (FSL) आणि टॉक्सिकॉलॉजी अहवालात मृत तरुणाच्या शरीरामध्ये ‘MDMA’ (एक्स्टसी) या अमली पदार्थाचे अंश सापडले आहेत. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तपासात पोलिसांनी या घटनेत ड्रग्जचा कोणताही संबंध नसल्याचा अंदाज वर्तवला होता, जो आता पूर्णपणे फसला असल्याचे सिद्ध झाले आहे. अहवालानुसार, मृत्यूपूर्वी त्याच्या शरीरात अल्कोहोलसोबतच या अमली पदार्थाचे मिश्रण गेले होते.

तपासाची चक्रे फिरली; पोलिसांसमोर नवीन आव्हाने

नवीन वैद्यकीय पुराव्यांमुळे मुंबई पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे. या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री किंवा पुरवठा करणारी टोळी सक्रिय होती का, यादृष्टीने आता तपास केला जात आहे. संबंधित तरुणाने कार्यक्रमाच्या आवारात येण्यापूर्वी ड्रग्ज घेतले होते की त्याला कॉन्सर्टच्या आत ते पुरवण्यात आले, या मुख्य प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

हेही वाचा – Ratnagiri Accident: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! भरधाव क्रेटा उभ्या डंपरवर आदळली; चौघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

सहभागी तरुणीला डिस्चार्ज 
महोत्सवादरम्यान ओडिसा येथील एक 25 वर्षीय तरुणी देखील अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली होती. तिच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथून प्रकृती सुधारल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमध्ये आधी ड्रग्जचा अँगल फेटाळणाऱ्या पोलिसांना आता या नवीन फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची नव्याने आणि सखोल चौकशी करावी लागणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number