Pariksha Pe Charcha Registration 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ (PPC 2026) या उपक्रमाच्या 9 व्या आवृत्तीला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमासाठी आतापर्यंत 30 दशलक्ष (मोजणीनुसार 3,06,55,280) पेक्षा जास्त नोंदणी झाली असून एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. दरम्यान, नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू असून 11 जानेवारी 2026 रोजी ती बंद होईल. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी (PPC 2025) आठव्या आवृत्तीसाठी 35 दशलक्ष सहभागींनी अर्ज केले होते.
अर्जांची आकडेवारी (30 डिसेंबर संध्याकाळपर्यंत)
एकूण विद्यार्थी: 2,85,96,651 (2.85 कोटींपेक्षा जास्त)
शिक्षक: 17,08,703
पालक: 3,49,926
पंतप्रधान साधणार थेट संवाद
या 9 व्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधतील. परीक्षेचा ताण कसा कमी करावा आणि प्रभावी तयारी कशी करावी, यावर पंतप्रधान मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही, मात्र निवडक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान स्वतः या सत्रात देतील.
हेही वाचा – IPS Birdev Done : गरुडझेप! नऊवारीतील आई अन् घोंगडं घेतलेले वडील IPS मुलासोबत विमानात बसतात तेव्हा…
अर्ज कसा करावा?
– innovateindia.mygov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– ‘आता सहभागी व्हा’ (Participate Now) बटणावर क्लिक करा.
– विद्यार्थी, शिक्षक किंवा पालक ही योग्य श्रेणी निवडा.
– आवश्यक माहिती भरून फॉर्म सबमिट करा आणि प्रिंटआउट घ्या.
– यशस्वी नोंदणीनंतर, तुम्हाला सहभागाचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल.
Registrations for Pariksha Pe Charcha, the flagship initiative of Prime Minister Shri Narendra Modi, have crossed a historic milestone, with over 3 crore registrations from students, parents, and teachers as of December 30, 2025. Register here to participate in Pariksha Pe… pic.twitter.com/e8I3HpVL5g — Ministry of Education (@EduMinOfIndia) December 31, 2025
उपक्रमाचा उद्देश
‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती घालवणे, परीक्षेचा ताण कमी करणे आणि वैयक्तिक विकासासाठी संतुलित दृष्टिकोनाला प्रोत्साहन देणे हा आहे.