Ambassador Recruitment 2026 : मोठी घोषणा! थेट राजदूत बनण्याची सुवर्णसंधी; परराष्ट्र सेवेत सर्वसामान्यांना मिळणार प्रवेश

या प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या राजदूताचा कार्यकाळ एकूण 4 वर्षांचा असेल आणि हे पद राजपत्रित विशेष श्रेणीच्या समकक्ष मानले जाईल.

Ambassador Recruitment 2026 : मोठी घोषणा! थेट राजदूत बनण्याची सुवर्णसंधी; परराष्ट्र सेवेत सर्वसामान्यांना मिळणार प्रवेश

Nepal ambassador recruitment 2026 : परराष्ट्र क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी नेपाळ सरकारने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट राजदूत (Ambassador) पदासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून अर्ज मागवले आहेत. या संदर्भात एक 7 पानांचा (7 pages) अधिकृत दस्तऐवज आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. परराष्ट्र सेवेत (Foreign Service) नसलेल्या पण योग्य पात्रता आणि कौशल्य असलेल्या गुणवान नागरिकांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देणे, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सरकारच्या या पारदर्शक आणि गुणवत्तेवर आधारित निर्णयाचे नेपाळमध्ये सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

निवडीसाठी आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
या प्रतिष्ठित पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सरकारने काही कडक अटी आणि नियमांची रूपरेषा आखून दिली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी खालील पात्रता असणे अनिवार्य आहे:
– नागरिकत्व आणि वय: अर्जदार हा नेपाळचा नागरिक असावा आणि त्याचे वय किमान 35 वर्षे पूर्ण असावे. तसेच उमेदवाराकडे इतर कोणत्याही देशाचे कायमचे नागरिकत्व किंवा वास्तव्य (Permanent Resident) नसावे.
– शैक्षणिक पात्रता: उमेदवार किमान पदवीधर (Graduate) असावा, मात्र पदव्युत्तर (Postgraduate) शिक्षण घेतलेल्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
– भाषा आणि चारित्र्य: उमेदवाराचे परदेशी भाषांवर, विशेषतः इंग्रजीवर उत्तम प्रभूत्व असावे. तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पूर्णपणे स्वच्छ असावी; भ्रष्टाचार किंवा नैतिक अधःपतनाचे गुन्हे दाखल असलेले उमेदवार अपात्र ठरतील.

या उमेदवारांना मिळणार भरतीमध्ये अतिरिक्त फायदा
नेपाळ सरकारने केवळ शैक्षणिक पदवीवर विसंबून न राहता उमेदवाराच्या एकूण ज्ञानाला महत्त्व देण्याचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय संबंध, राज्यशास्त्र, कायदा, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन यांसारख्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना या निवडीमध्ये अधिक महत्त्व दिले जाईल. याशिवाय, ज्या उमेदवारांनी नेपाळच्या परराष्ट्र धोरणावर संशोधन केले आहे, पुस्तके किंवा लेख लिहिले आहेत, त्यांच्या या शैक्षणिक योगदानाचाही सकारात्मक विचार केला जाईल. जागतिक व्यापार, राजनैतिक वाटाघाटीचे कौशल्य आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करण्याचा आराखडा उमेदवारांना स्पष्ट करावा लागेल.

हेही वाचा – Middle East Crisis: 'इराणने भारतीय जहाजांवर हल्ला केला, आम्ही…'; भारताच्या दबावानंतर डोनाल्ड ट्रम्प बॅकफूटवर, संबंध सुधारण्याचा प्रयत्न

एकूण रिक्त पदे आणि 'या' देशांमध्ये मिळणार नियुक्ती
या प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या राजदूताचा कार्यकाळ एकूण 4 वर्षांचा असेल आणि हे पद राजपत्रित विशेष श्रेणीच्या समकक्ष मानले जाईल. सध्या नेपाळची विविध देशांमधील 17 राजनैतिक पदे रिक्त असून, ऑगस्टपर्यंत यामध्ये आणखी 7 पदांची भर पडणार आहे. म्हणजेच सप्टेंबरपर्यंत रिक्त पदांची एकूण संख्या 24 होणार आहे. यामध्ये खालील देशांमधील नेपाळी दूतावासांचा समावेश आहे:
– भारत, चीन, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया.
– इस्रायल, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रिया, बहरीन आणि बांगलादेश.
– मलेशिया, ओमान, सौदी अरेबिया आणि काही प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था.

अर्जासोबत हे सादर करणे आहे बंधनकारक
या पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला केवळ कागदपत्रे जोडून चालणार नाही, तर त्यासोबत एक सविस्तर अर्ज किंवा निबंध सादर करावा लागेल. यामध्ये 'आपण या पदासाठी का योग्य आहोत?' आणि 'राजदूत म्हणून नियुक्ती मिळाल्यास देशासाठी काय करायला आवडेल?' हे स्पष्टपणे नमूद करावे लागेल. संयुक्त राष्ट्र (UN), सार्क (SAARC) आणि बिमस्टेक (BIMSTEC) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कामकाजाची उत्तम माहिती असलेल्या आणि उत्तम नैतिक चारित्र्य असलेल्या उमेदवारांना या प्रक्रियेत अतिरिक्त लाभ मिळेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Ariana Grande slams White House : 'माझं संगीत कधीही वापरू नका'; पॉप स्टार एरियाना ग्रांडे हिची ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसवर कडक शब्दांत टीका

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number