NEET UG 2026 : NEET परीक्षेचा पॅटर्न बदलणार! पुढील परीक्षा OMR शीटऐवजी आता…

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगितले.

NEET UG 2026 : NEET परीक्षेचा पॅटर्न बदलणार! पुढील परीक्षा OMR शीटऐवजी आता…

NEET UG 2026: NEET (UG) 2026 च्या पेपरफुटीच्या वादामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असताना, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे हित जोपासणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे सांगत, पुढच्या वर्षापासून NEET परीक्षेच्या स्वरूपात मोठा बदल करण्याची घोषणा केली. “पुढच्या वर्षापासून NEET परीक्षा OMR शीटवर न होता संगणकावर आधारित (Computer-based) असेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं. या बदलामुळे परीक्षेतील पारदर्शकता वाढेल आणि मानवी हस्तक्षेपाची शक्यता कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुनर्परीक्षेचे नियोजन आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा
रद्द झालेली NEET-UG परीक्षा आता 21 जून रोजी घेतली जाणार असून, त्यासाठीच्या प्रशासकीय तयारीची माहितीही मंत्र्यांनी दिली. या पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा शहर निवडण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी दिला जाणार आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे (Admit Cards) 14 जून पर्यंत जारी केली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी या परीक्षेदरम्यान त्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाणार आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

पेपरफुटीवर कडक कारवाई आणि सीबीआय तपास
पेपरफुटीच्या घटनेवर भाष्य करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, 3 मे रोजी झालेल्या परीक्षेनंतर 7 मे रोजी प्रश्नपत्रिका फुटल्याची तक्रार प्राप्त झाली होती. चौकशीअंती तक्रारीत तथ्य आढळल्याने 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. “ही परीक्षा माफिया आणि समाजकंटकांविरुद्धच्या एका दीर्घकालीन लढ्याची सुरुवात आहे,” असे सांगत त्यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याचे जाहीर केले. सीबीआयने तपासाला सुरुवात केली असून, दोषींवर अत्यंत कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हेही वाचा – NEET Re-Exam 2026 New Date : आताची मोठी बातमी! नीट 2026 च्या पुनर्परीक्षेचा नवी तारीख जाहीर; केंद्रीय शिक्षण मंत्री देणार अधिकची माहिती

NTA कडून 21 जूनची तयारी पूर्ण
‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (NTA) पुनर्परीक्षेसाठी 21 जून ही तारीख निश्चित केली आहे. 7 मे रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, एका ‘गेस पेपर’मधील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचे निदर्शनास आले होते. पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number