Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई व उरण परिसरातील नागरिकांना डिसेंबर महिन्यात मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. रानसाई धरणातील जलसाठा धोक्याच्या तळाशी पोहोचल्यानंतर एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवस नियोजित पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणातील उपलब्ध पाणी आणि नागरिकांच्या वाढत्या मागणीतील मोठ्या तफावतीमुळे हा कठोर उपाय योजावा लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Microsoft Satya Nadela : महाराष्ट्र बनेल AI हब! मायक्रोसॉफ्टकडून 1.57 लाख कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक
उरण आणि आसपासच्या भागासाठी प्रमुख स्त्रोत असलेल्या रानसाई धरणाची क्षमता मर्यादित असल्याने पावसाळ्यातील पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने साठवून ठेवता येत नाही. परिणामी दरवर्षी या भागात उन्हाळ्यापूर्वीच पाण्याचा तुटवडा जाणवू लागतो. सध्या उरण क्षेत्रात दररोज साधारण 41 मिलियन लिटर पाण्याची गरज भासते. मात्र उपलब्ध साठ्यानुसार एमआयडीसीकडे फक्त 30 मिलियन लिटरपुरते पाणी आहे. त्यामुळे जून 2026 पर्यंत पाईपलाईन कोरडी पडू नये, म्हणून पुरवठा कमी करणे अनिवार्य झालं आहे.
हेही वाचा – Winter Session 2025: प्रसाद लाड यांना सभागृहात लागला शॉक; म्हणाले, 'मला काही झालं तर राज्याचं नुकसान होईल'
कधी होणार पाणीकपात?
महिनाभरासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी संपूर्ण उरण भागात पाणीपुरवठा थांबवला जाणार आहे. ही पूर्वतयारी जास्तीत जास्त काळ जलसाठा टिकवून ठेवण्यासाठी करण्यात आली असून नागरिकांनी पाणी वापरात काटकसर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, नवी मुंबईसोबतच मुंबईतील काही विभागांनाही पाणीकपातीचा फटका बसणार आहे. बीएमसीने महत्त्वाच्या पाईपलाइनच्या देखभालीची कामे सुरू केल्याने शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 या 24 तासांदरम्यान के ईस्ट (जोगेश्वरी-अंधेरी पूर्व), एच ईस्ट (खार-वांद्रे पूर्व) आणि जी नॉर्थ (धारावी) या विभागांचा पुरवठा पूर्णपणे बंद राहील. अंधेरी पूर्वेतील काही भागांमध्ये कमी दाबाचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पुढील काही दिवसांत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.