Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला DGCA ने दिला महत्त्वाचा परवाना; काय होणार फायदा? जाणून घ्या

या परवान्यामुळे विमानतळाने कठोर सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.<br/>

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाला DGCA ने दिला महत्त्वाचा परवाना; काय होणार फायदा? जाणून घ्या

Navi Mumbai Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला आता अंतिम टप्प्यातील गती मिळाली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या बहुप्रतिक्षित विमानतळाला एरोड्रम परवाना दिला आहे. यामुळे विमानतळाने कठोर सुरक्षा आणि नियामक निकष पूर्ण केल्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यास नवी मुंबई प्रकल्पाची मदत 

हा परवाना मिळाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. प्रवासी व मालवाहतूक कनेक्टिव्हिटी वाढवण्यासोबतच विद्यमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करण्यात यामुळे मोठा दिलासा मिळेल.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगग्रस्तांसाठी महाकेअर फाऊंडेशन, तसेच उद्योगविभागासाठी विशेष तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीतील 5 मोठे निर्णय

पहिल्या टप्प्यात दरवर्षी 20 दशलक्ष प्रवाशांची क्षमता 

दरम्यान, हा प्रकल्प अदानी समूह आणि महाराष्ट्र सरकारच्या सिडकोच्या संयुक्त प्रयत्नातून साकारला जात आहे. विमानतळ पाच टप्प्यात उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातच दरवर्षी 20 दशलक्ष प्रवासी आणि सुमारे 0.5 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता असेल..

हेही वाचा – मोठा निर्णय! शेतकऱ्यांना मिळणार थेट मदत, ओला दुष्काळाच्या सवलती लागू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान मोदींकडून उद्घाटनाची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या विमानतळाचे उद्घाटन करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई-पुणे-नाशिक आर्थिक कॉरिडॉरमध्ये आर्थिक विकासाला चालना देण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number