Vidarbha Heatwave: विदर्भात आजपासून ‘नवतपा’ला सुरुवात; पुढील 9 दिवस तीव्र उष्णतेची लाट, पारा 47 अंशांवर

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 9 दिवस (25 मे ते 2 जून) संपूर्ण विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) असणार असून या काळात सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे.

Vidarbha Heatwave: विदर्भात आजपासून ‘नवतपा’ला सुरुवात; पुढील 9 दिवस तीव्र उष्णतेची लाट, पारा 47 अंशांवर

Vidarbha Heatwave: संपूर्ण विदर्भासाठी पुढील काही दिवस अत्यंत सुसह्य आणि आव्हानात्मक असणार आहेत. मे महिन्याच्या शेवटी रोहिणी नक्षत्रात सूर्य प्रवेश करत असल्याने विदर्भात आजपासून म्हणजेच 25 मे पासून ‘नवतपा’ला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 9 दिवस (25 मे ते 2 जून) संपूर्ण विदर्भामध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) असणार असून या काळात सूर्य अक्षरशः आग ओकणार आहे. जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीचा हा काळ विदर्भासाठी अत्यंत कठीण मानला जातो.

ब्रह्मपुरीत तापमान 47 अंशांवर; नागपूरचा पाराही 45 अंशा पार
नवतपाच्या सुरुवातीलाच विदर्भातील तापमानाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे तब्बल 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर उपराजधानी नागपुरातही तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. पुढील 9 दिवसांत संपूर्ण विदर्भातील विविध जिल्ह्यांचा पारा 45 ते 47 अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे ही परिस्थिती अधिक भयानक रूप धारण करत आहे.

हेही वाचा – Pune Accident News : भीषण अपघात! अहिल्यानगर – कल्याण महामार्गावर एसटीची दुचाकीला धडक; चार जणांचा मृत्यू

दुपारी 11 ते 4 दरम्यान बाहेर पडणे टाळा; प्रशासनाचे कडक आवाहन
विदर्भातील ही परिस्थिती लक्षात घेता स्थानिक प्रशासनाकडून सामान्य नागरिकांसाठी विशेष खबरदारीची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. अत्यंत कडक ऊन आणि उष्ण वाऱ्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी दुपारच्या वेळी, म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन; पावसाळ्यापूर्वीचा कठीण काळ
पुढील 9 दिवस विदर्भासाठी अत्यंत कठीण असणार आहेत. या काळात उष्माघाताचा (Heat Stroke) मोठा धोका संभवतो, त्यामुळे नागरिकांनी भरपूर पाणी प्यावे, सुती कपडे वापरावेत आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. रोहिणी नक्षत्राच्या प्रभावामुळे निर्माण होणारी ही उष्णतेची लाट जूनच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number