Yeola Water Shortage : येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई! 23 गावे अन् 8 वाड्या टँकरच्या भरवशावर

सध्या 19 टँकर्सच्या मदतीने दिवसभरात सुमारे 32 फेऱ्या करून तहानलेल्या गावांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे.

Yeola Water Shortage : येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई! 23 गावे अन् 8 वाड्या टँकरच्या भरवशावर

Yeola Water Shortage : नाशिक जिल्ह्यात सध्या उन्हाच्या झळांसोबतच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. यातही येवला तालुक्याची स्थिती सर्वात जास्त गंभीर झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असतून सर्वाधिक टँकर सध्या एकट्या येवला तालुक्यात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील 23 गावे आणि 8 वाड्यांमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या 19 टँकरद्वारे या भागांत पाणीपुरवठा केला जात असून, पाणीटंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

महिलांची पायपीट आणि जुनीच व्यथा
पाणीटंचाईच्या या संकटामुळे ग्रामीण भागातील महिलांचे प्रचंड हाल होत आहेत. “लग्नाला 2 वर्षे झाली तरी हीच परिस्थिती अनुभवत आहे,आणि त्याआधीही उन्हाळ्यात पाण्यासाठी गाव टँकरवरच अवलंबून होते,” अशी व्यथा एका स्थानिक महिलेने मांडली. टँकर वेळेवर येत नसल्यामुळे किंवा पाणी अपुरे पडत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अनेक ठिकाणी विकतचे पाणी घेण्याची वेळ लोकांवर आली असून, ही समस्या अनेक वर्षांपासून पिच्छा सोडत नसल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा – Maharashtra Weather Update: सावधान! पुढील 48 तास महत्त्वाचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

प्रशासकीय नियोजन आणि वाढत्या फेऱ्या
सध्या 19 टँकर्सच्या मदतीने दिवसभरात सुमारे 32 फेऱ्या करून तहानलेल्या गावांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. वाढती उष्णता आणि कोरडे पडलेले पाण्याचे स्रोत लक्षात घेता, जसे नवीन प्रस्ताव प्रशासनाकडे येतील, तशी टँकरची संख्या आणखी वाढवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दिवसभरातील फेऱ्यांची संख्या वाढवूनही लोकांची पाण्याची गरज पूर्ण करणे कठीण होत आहे, ज्यामुळे येत्या काळात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जनावरांच्या पाण्याचाही यक्षप्रश्न
केवळ माणसांसाठीच नव्हे, तर जनावरांनाही पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. या पाणीटंचाईचा मुक्या जनावरांनाही बसत असलेला मोठा फटका शेतकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणत आहे. शेतकरी आणि ग्रामस्थांनी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठीही विशेष तरतूद करण्याची मागणी केली आहे. ढोर-वासरांची तहान भागवण्यासाठी टँकरचे पाणी पुरेसे ठरत नाही, त्यामुळे शेती आणि पशुपालन धोक्यात आले आहे. प्रशासनाने टँकरची संख्या वाढवून नियमितपणे पाणीपुरवठा करावा, जेणेकरून महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबेल आणि जनावरांनाही जीवदान मिळेल, अशी मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा – Ancestral Land Partition : राज्य सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट! वडिलोपार्जित जमिनीचे वाटणीपत्र आता मोफत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number