Sant Nivruttinath Palkhi 2026: संत निवृत्तीनाथांचा रथ ओढण्याचा मान नाशिकच्या ‘सर्जा-भास्कर’ला; माऊलींच्या पालखीचे वेळापत्रकही जाहीर

यंदाच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचा मान इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावातील ‘सर्जा-भास्कर’ या बैलजोडीला मिळाला आहे.

Sant Nivruttinath Palkhi 2026: संत निवृत्तीनाथांचा रथ ओढण्याचा मान नाशिकच्या ‘सर्जा-भास्कर’ला; माऊलींच्या पालखीचे वेळापत्रकही जाहीर

Sant Nivruttinath Palkhi 2026: आषाढी वारीची चाहूल लागताच वारकरी संप्रदायात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी रथ ओढण्याचा मान इगतपुरी तालुक्यातील मुरंबी गावातील ‘सर्जा-भास्कर’ या बैलजोडीला मिळाला आहे. या निवडीमुळे बैलांचे मालक आणि वारकरी शेतकरी गजीराम पुंजा यांच्यामते यांच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला असून भावनिक क्षणी त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.

5 वर्षांत दुसऱ्यांदा लाभला मान

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि सहनशक्ती असलेल्या बैलजोड्यांची निवड केली जाते. यंदा ‘सर्जा-भास्कर’ या बैलजोडीची निवड झाल्याने या जोडीला गेल्या 5 वर्षांतील दुसऱ्यांदा हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. त्यामुळे मुरंबी गावातही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

50 दिवसांच्या वारीसाठी विशेष तयारी

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि परतीचा असा जवळपास 50 दिवसांचा पालखी प्रवास असतो. या काळात दररोज अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. विशेषतः पावसाळी वातावरणात रथ ओढण्यासाठी सक्षम बैलांची आवश्यकता असते. त्यामुळे निवड प्रक्रियेत बैलांची ताकद, प्रशिक्षण आणि शारीरिक क्षमता यांचा कसून विचार केला जातो. रथ आणि नगारा गाडी ओढण्यासाठी वेगवेगळ्या बैलजोड्या आलटून-पालटून जबाबदारी पार पाडतात.

सिन्नरच्या बैलजोडीलाही पहिल्यांदाच संधी

यंदाच्या निवड प्रक्रियेत सिन्नर तालुक्यातील सुरेगाव येथील शेतकरी संपत भालेराव यांच्या ‘चित्या’ आणि ‘धिंगाण्या’ या बैलजोडीचीही निवड करण्यात आली आहे. संत निवृत्तीनाथांच्या पालखी रथासाठी सिन्नर तालुक्यातील बैलजोडीला प्रथमच संधी मिळाल्याने भालेराव कुटुंबासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. निवडीनंतर बैलांच्या आहार आणि आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यांना पौष्टिक खुराक दिला जात आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे वेळापत्रक जाहीर

दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे यंदाचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. आळंदीहून पालखी 8 जुलै रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असून 24 जुलै रोजी विठ्ठलनगरीत दाखल होणार आहे. या प्रवासादरम्यान 17 मुक्काम, चार गोल रिंगण आणि तीन उभी रिंगणे आयोजित करण्यात येणार आहेत.

हेही वाचा – Radhakrishna Vikhe Patil Meets Manoj Jarange: ‘चर्चा निष्फळ…’; जरांगेंच्या उपोषणस्थळी पोहोचले विखे पाटील, दिलं मोठं आश्वासन

पुणे, सासवड, जेजुरीसह विविध ठिकाणी मुक्काम

प्रस्थानानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पालखीचा मुक्काम पुण्यात राहणार आहे. त्यानंतर सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर आणि भेंडीशेगाव अशा विविध ठिकाणी मुक्काम आणि रिंगण सोहळे पार पडतील. वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांसाठी हा सोहळा भक्ती, परंपरा आणि सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव ठरणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number