LPG Crisis: कतारहून ‘नंदा देवी’ आणि ‘शिवालिक’ जहाजे भारतात दाखल; यातील एकूण 92,712 टन गॅसने किती सिलिंडर भरले जातील?

भारताचे दोन महत्त्वाचे गॅस टँकर्स भारतीय बंदरात सुरक्षितपणे पोहोचले आहेत. या एकूण साठ्यातून किती घरगुती सिलेंडर्स भरले जाऊ शकतात, जाणून घेऊ.

LPG Crisis: कतारहून ‘नंदा देवी’ आणि ‘शिवालिक’ जहाजे भारतात दाखल; यातील एकूण 92,712 टन गॅसने किती सिलिंडर भरले जातील?

Nanda Devi and Shivalik LPG Ships Arrive in India from Qatar : पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा महत्त्वाचा जलमार्ग बंद (Impact of Strait of Hormuz Closure) केल्याने अनेक देशांची जहाजे अडकून पडली होती. मात्र, भारत सरकारने इराणसोबत यशस्वी राजनैतिक चर्चा करून कतारहून येणारी गॅसने भरलेली दोन महाकाय जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढली आहेत. भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असला तरी, घरगुती गॅस (LPG) पुरवठ्याबाबत निर्माण झालेली चिंता या निर्णयामुळे दूर झाली आहे.

इराणच्या वेढ्यातून भारतीय जहाजांची सुटका
इराण आणि इस्रायलमधील संघर्षामुळे इराणने पर्शियन आखातातील महत्त्वाचा मार्ग रोखला होता. या मार्गावरून जगातील बहुतांश कच्च्या तेलाची आणि गॅसची वाहतूक होते. भारताने तातडीने इराणच्या नेतृत्वाशी संपर्क साधून आपले दोन महत्त्वाचे गॅस टँकर्स बाहेर काढण्यासाठी परवानगी मिळवली. 'नंदा देवी' आणि 'शिवालिक' अशी या दोन जहाजांची नावे असून, ती आता भारतीय बंदरात सुरक्षितपणे पोहोचली आहेत. भारताच्या या मध्यस्थीमुळे ऐन युद्धकाळात देशातील स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा टळला आहे.

हेही वाचा – India Energy Security: युद्धजन्य परिस्थितीतही भारताची 'ऊर्जा सुरक्षा' भक्कम; गॅस सिलेंडरच्या रांगांवर सरकारने स्पष्ट केले वास्तव

92,712 मेट्रिक टन LPG चे अवाढव्य गणित
या दोन जहाजांमधून एकूण 92,712 मेट्रिक टन एलपीजी (LPG) भारतात आणला गेला आहे. यामध्ये 'नंदा देवी' जहाजावर 46,000 मेट्रिक टन गॅस असून उर्वरित गॅस 'शिवालिक' जहाजावर आहे. जर आपण एका घरगुती गॅस सिलिंडरमध्ये 14.2 किलो गॅस भरला जातो असे धरले, तर या एकूण साठ्यातून सुमारे 65 लाखांहून अधिक गॅस सिलिंडर भरले जाऊ शकतात. इतक्या मोठ्या प्रमाणात आलेला गॅस साठा उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि सामान्य ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

रॉकेट वेगाने e-KYC आणि गॅस वितरण
गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने आता 'Aadhaar e-KYC' आणि 'Direct Benefit Transfer' (DBT) प्रक्रियेला गती दिली आहे. ग्राहकांनी आपल्या मोबाईलवरील 'AadhaarFaceRD' ॲपद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या जात आहेत. यामुळे सबसिडीचा लाभ थेट पात्र ग्राहकांच्या खात्यात जमा होणे सोपे होणार आहे. युद्धाच्या सावटाखालीही भारताने आपला गॅस पुरवठा साखळी सुरक्षित ठेवून एक मोठे संकट परतवून लावले आहे.

हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा UAE राष्ट्रपतींना फोन; पश्चिम आशियातील तणावावर महत्त्वाची चर्चा, स्ट्रेट ऑफ होर्मुज बाबत…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number