Nalanda Stampede: नालंदा हादरलं! शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

प्रसिद्ध शीतला मंदिरात मंगळवारी पहाटे दर्शनासाठी झालेल्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 8 भाविकांना आपला जीव गमवावा लागला.

Nalanda Stampede: नालंदा हादरलं! शीतला मंदिरात भीषण चेंगराचेंगरी; 8 भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Nalanda Stampede:  बिहारमधील नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील प्रसिद्ध शीतला मंदिरात मंगळवारी पहाटे दर्शनासाठी झालेल्या गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्दैवी घटनेत 8 भाविकांना आपला जीव गमवावा लागला असून, इतर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून उत्सवाच्या वातावरणावर शोकाकुळ कळा पसरली आहे.

अनियंत्रित गर्दीमुळे निर्माण झाला गोंधळ
मिळालेल्या माहितीनुसार, दीप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मगरा गावातील शीतला मंदिरात मंगळवारी भाविकांची अलोट गर्दी जमली होती. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेनुसार पूजा-अर्चा आणि विधी सुरू असताना अचानक भाविकांची गर्दी अनियंत्रित झाली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी बॅरिकेड्स आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही परिस्थिती हाताबाहेर गेली आणि सैरावैरा धावणाऱ्या लोकांच्या पायाखाली दबून अनेकांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

अफवा ठरली का दुर्घटनेचे कारण?
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शी तरुणाने सांगितले की, “पहाटेपासून सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र अचानक लोक घाबरून धावू लागले. कदाचित कोणीतरी खोटी अफवा पसरवली असावी, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.” विशेष म्हणजे, या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक येतात, मात्र यापूर्वी कधीही अशी दुर्घटना घडली नव्हती. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे स्थानिक प्रशासन आणि भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा – Plane Emergency Landing: हवेमध्येच तांत्रिक बिघाड, अन् वैमानिकाने प्रसंगावधान राखलं; एअर इंडियाच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

पोलीस तपासाला वेग आणि शोकाकूल वातावरण
ज्या ठिकाणी ही घटना घडली, ते शीतला मंदिर बिहार शरीफ परिसरातील मगरा येथे आहे. मंगळवारचा दिवस असल्याने देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक रांगेत उभे होते. आता या चेंगराचेंगरीमागे केवळ गर्दी कारणीभूत होती की काही कट-कारस्थान किंवा अफवा पसरवण्यात आली होती, याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असून, संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number