Ashok Kharat Case: खरातच्या फार्महाऊस परिसरात सापडली रहस्यमय विहीर; रिमोट कंट्रोलच्या मदतीने भक्तांना द्यायचा सापाचे दर्शन

खरातच्या 17 एकरच्या विस्तीर्ण आमराईत असलेल्या फार्महाऊसवर एका 'रहस्यमय विहिरी'चा शोध लागला असून, ही विहीर त्याच्या काळ्या कृत्यांची साक्षीदार असल्याचे मानले जात आहे.

Ashok Kharat Case: खरातच्या फार्महाऊस परिसरात सापडली रहस्यमय विहीर; रिमोट कंट्रोलच्या मदतीने भक्तांना द्यायचा सापाचे दर्शन

Ashok Kharat Case: वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी साम्राज्यातील एकामागून एक धक्कादायक गुपिते आता बाहेर येत आहेत. खरातच्या 17 एकरच्या विस्तीर्ण आमराईत असलेल्या फार्महाऊसवर एका ‘रहस्यमय विहिरी’चा शोध लागला असून, ही विहीर त्याच्या काळ्या कृत्यांची साक्षीदार असल्याचे मानले जात आहे. ईशानेश्वर मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या या विहिरीचा वापर खरात भक्तांना घाबरवण्यासाठी आणि अघोरी पूजा करण्यासाठी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. 

हाय-टेक ‘जादूचा साप’ आणि रिमोट कंट्रोलचा खेळ
या विहिरीच्या परिसरात पोलिसांना काही संशयास्पद ‘वायरलेस डिवाइसेस’ आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली आहेत. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, खरात या उपकरणांच्या माध्यमातून विहिरीतून ‘शेषनागाचे दर्शन’ होत असल्याचा बनाव रचायचा. रिमोट कंट्रोलने ऑपरेट होणारा एक बनावट ‘जादूचा साप’ या विहिरीत ठेवला जात असे, जो नेमका पूजेच्या वेळी बाहेर काढून भक्तांना चमत्काराचा भास करून दिला जायचा. मोठी पदे मिळवून देण्याचे किंवा स्वप्न साकारण्याचे आमिष दाखवून खरात भक्तांना या विहिरीवर आणून त्यांना भीती दाखवत असे.

नरबळी आणि अघोरी कृत्यांचा संशय
खरात या विहिरीचा वापर केवळ चमत्कारासाठीच करत होता की त्यामागे आणखी काही भीषण वास्तव आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत. न्यायालयात खरातविरुद्ध तंत्र-मंत्र आणि नरबळी दिल्याचे गंभीर दावे करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, या रहस्यमय विहिरीचा वापर नरबळीसारख्या अघोरी कृत्यांसाठी तर केला गेला नाही ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. विहिरीच्या 50 मीटर अंतरावर असलेले मंदिर आणि तिथली भौगोलिक रचना पाहता, हा परिसर अत्यंत गूढ वाटतो.

हेही वाचा – Devendra Fadnavis: ‘लिंबू-मिरचीने युद्ध जिंकता आली असती, तर खरातला सुरक्षा सल्लागार केलं असतं…’; भोंदूगिरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

नाशिक पोलिसांकडून सखोल तपास सुरू
या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलिसांचे विशेष पथक आता तांत्रिक पुराव्यांचे विश्लेषण करत आहे. विहिरीपाशी मिळालेले इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस कोठून आणले गेले आणि त्यांचा वापर नेमका कसा केला जायचा, याचा तपास सुरू आहे. खरातच्या या 17 एकरच्या मायेत आणखी किती रहस्ये गाडली गेली आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. पोलिसांच्या या कारवाईमुळे भोंदूगिरीच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या हाय-टेक रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number