‘माझी लेक…’ डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले अशोक पालवे?

डॉ. गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर थेट गंभीर आरोप लावले आहेत. त्यांच्या मते, अनंत गर्जेने केलेले दावे चुकीचे असून तो संपूर्ण प्रकरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे.

‘माझी लेक…’ डॉक्टर गौरी पालवेच्या मृत्यूनंतर वडिलांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले अशोक पालवे?

Pankaja Munde's PA Anant Garje Wife Death: मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पती–पत्नीमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अनंत आणि गौरी यांचे फेब्रुवारी महिन्यात लग्न झाले होते. परंतु काही महिन्यांतच नात्यात दुरावा निर्माण झाला. अनंत गर्जे यांचे बाहेर काही महिलांशी संबंध असल्याची माहिती गौरीला मिळाल्याने वाद अधिक चिघळला. तिने त्याबाबत अनंतला जाबही विचारला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, गौरीने पतीला माफ केले होते, तरीही त्याचा बाहेरील संबंध कायम असल्याचे तिला पुन्हा लक्षात आले. त्यामुळे दोघांत अनेक वेळा जोरदार भांडण झाल्याचे सांगितले जाते.

कुटुंबीयांचा आक्रोश, अनंत गर्जेवर थेट आरोप

डॉ. गौरीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर थेट गंभीर आरोप लावले आहेत. त्यांच्या मते, अनंत गर्जेने केलेले दावे चुकीचे असून तो संपूर्ण प्रकरणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. कुटुंबाच्या भावना अतिशय व्याकूळ करणाऱ्या आहेत. गौरीचे वडील अशोक पालवे यांनी, “आता मी काय बोलू… माझी लेक निघून गेली,” असे म्हणत दुःख व्यक्त केले. गौरीची आईही पोलीस ठाण्यात ढाय मोकलून रडत आहेत. 

हेही वाचा – Paknja Munde PA Wife : मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने संपवलं जीवन; कुटुंबियांचे गंभीर आरोप

गौरीच्या मृत्यूवेळी अनंत उपस्थित होता का?

या प्रकरणात आणखी एक नवीन वळण समोर आले आहे. काही जणांच्या मते गौरीने आयुष्य संपवलं तेव्हा अनंत घरीच होता. परंतु अनंत गर्जेने हे दावे फेटाळले असून, “मी त्या वेळी घरी नव्हतो. गौरीने दरवाजे आतून बंद करून जीनव संपवलं,” असा दावा त्याने केला आहे. त्याने घरात प्रवेश कसा केला, याबाबतही अनंतने हे स्पष्टीकरण दिले. 

हेही वाचा –  Pankaja Munde's PA Anant Garje Wife Death : "घरात पोहचल्यावर मी पाहिलं गौरी…" पत्नीच्या मृत्यूनंतर अनंत गर्जेंची पहिली प्रतिक्रिया

पोलीस तपासाचा महत्त्वाचा टप्पा

सध्या गौरीचे कुटुंबीय वरळी पोलीस ठाण्यात आहेत आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले गेले असून अंजली दमानिया यांनीही पोलीस ठाण्यात उपस्थित राहून माहिती घेतली. घटनेची माहिती समजताच पंकजा मुंडे यांनी तत्काळ आपला नियोजित दौरा थांबवला आहे. अनंत गर्जे यांच्यावर होणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही घटना राजकीयदृष्ट्याही संवेदनशील बनली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number