Mumbai Mhada Lottery 2026: मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा लॉटरी सोडतीबाबत मोठी अपडेट समोर

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण मंडळाकडून 2,640 घरांच्या संगणकीय सोडतीची अधिकृत तारीख पुढील आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे.

Mumbai Mhada Lottery 2026:  मुंबईकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा लॉटरी सोडतीबाबत मोठी अपडेट समोर

Mumbai Mhada Lottery 2026: मागील 3 महिन्यांपासून हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर दिलासादायक वृत्त समोर आले आहे. म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण मंडळाकडून 2,640 घरांच्या संगणकीय सोडतीची अधिकृत तारीख पुढील आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याबाबतची माहिती दिली असून, या निर्णयामुळे हजारो अर्जदारांचा प्रदीर्घ प्रतीक्षेचा काळ आता संपणार आहे.

मुदतवाढ आणि आचारसंहितेमुळे लॉटरीचा निकाल लांबणीवर

म्हाडाने या गृहप्रकल्पाची घोषणा 30 मार्च रोजी केली होती. सुरुवातीच्या नियोजनानुसार 15 मे रोजी ही सोडत काढली जाणार होती. मात्र, सुरुवातीला मिळालेल्या प्रतिसादानंतर अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आणि नवी तारीख 5 जून ठरवण्यात आली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा फेरा लागू झाल्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली. जुलै महिना अर्धा संपूनही कोणतीही अधिकृत बातमी न आल्याने अर्जदारांमध्ये अस्वस्थता वाढली होती. मात्र, आता म्हाडाने सोडतीचा मार्ग मोकळा केला आहे.

2,640 घरांसाठी 75,366 दावेदार; प्रमुख भागांत परवडणारी घरे

या वेळच्या सोडतीसाठी नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, एकूण 2,640 सदनिकांसाठी तब्बल 75,366 अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहराच्या विविध भागांतील प्रकल्पांचा समावेश आहे:

अत्यल्प उत्पन्न गट (EWS): 145 घरे
अल्प उत्पन्न गट (LIG): 858 घरे
मध्यम उत्पन्न गट (MIG): 798 घरे
उच्च उत्पन्न गट (HIG): 839 घरे

ही घरे विक्रोळीचे कन्नमवार नगर, गोरेगावचे पत्राचाळ व पहाडी, बोरीवलीचे मागाठाणे व गोराई, चेंबूरचे सुभाष नगर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव आणि दादर अशा मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.

हेही वाचा – BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये BEST बसचा भीषण अपघात, रस्त्यावरील डिव्हायडरला धडक; एकाचा जागीच मृत्यू

विक्रोळीतील घरांवर 7.5 टक्के सूट; उच्च उत्पन्न गटाला विशेष संधी

अर्जदारांना अधिक दिलासा देण्यासाठी म्हाडाने विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील (संकेत क्रमांक 538 व 539) 1,221 बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या किमतीत 7.5 टक्के कपात केली आहे. यापैकी 610 सदनिका नवीन संकेत क्रमांक 538-A व 539-A अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आधुनिक सोयी-सुविधा आणि सवलतीचा दर यामुळे या गटालाही उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीची प्रत्यक्ष तारीख, वेळ आणि ठिकाण याविषयीचा सविस्तर तक्ता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच अपलोड केला जाईल. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number