Electric Double Decker : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान; ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवरून धावणार बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस

दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरे आणि नवी मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत आणि सुलभ करण्यासाठी बेस्टने एक महत्त्वाची योजना आणली आहे.

Electric Double Decker : मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान; ईस्टर्न फ्रीवे आणि अटल सेतूवरून धावणार बेस्टच्या इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस

Best Electric double decker bus: दक्षिण मुंबई, पूर्व उपनगरे आणि नवी मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत आणि सुलभ करण्यासाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने (बेस्ट) एक महत्त्वपूर्ण महायोजना आखली आहे. या योजनेनुसार मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्ग असलेल्या ईस्टर्न फ्रीवे आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूवरून अत्याधुनिक इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस धावणार आहेत. या उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा बूस्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बेस्ट समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय आणि शिफारसी
बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली बेस्ट समिती आणि 'आपली बेस्ट आपल्यासोबत' या संस्थेची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत खालील प्रमुख मुद्द्यांवर चर्चा करून शिफारसी करण्यात आल्या:
– ईस्टर्न फ्रीवेवर हाय-स्पीड बस सेवा त्वरित सुरू करण्यात यावी.
– ए-502 आणि ए-504 हे बस मार्ग वडाळा डेपोपर्यंत वाढवून घाटकोपरसह पूर्व उपनगरांना फ्रीवे कॉरिडॉरशी थेट जोडण्यात यावे.
– अटल सेतूमार्गे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान थेट बस वाहतूक वाढवण्यासाठी नव्या मार्गांची पुनर्रचना करण्यात यावी.
– कर्मचाऱ्यांची भासणारी कमतरता दूर करून कंत्राटी किंवा भाड्याच्या बसेसवरील अवलंबित्व कमी केले जावे.

हेही वाचा – Mumbai ABC Action : टो केलेली कार सोडण्यासाठी केली 10 हजारांची मागणी; ACB नं रचला सापळा, दोघांना घातल्या बेड्या

ताफ्यात नवीन बसेसचा समावेश आणि केंद्र सरकारची मदत
सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पुढील 15 दिवसांत पीएमआय (PMI) च्या 25 नवीन इलेक्ट्रिक बसेस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने बसेसचा पुरवठा केला जात असून, पुढील 1.5 वर्षांच्या कालावधीत सर्व बसेस ताफ्यात समाविष्ट करण्याचे नियोजन आहे. बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 प्रायव्हेट इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेस प्रत्यक्षात सेवेत दाखल झाल्या आहेत.

तांत्रिक अडचणी दूर करून 150अतिरिक्त डबल-डेकर बसेस मिळवण्याचे वेध
उर्वरित 150 इलेक्ट्रिक डबल-डेकर बसेसच्या वितरणाला करारातील काही तांत्रिक मुद्द्यांमुळे सध्या विलंब होत आहे. मात्र, या करारासंबंधीचे सर्व अडथळे लवकरात लवकर दूर करून उर्वरित 150 बसेस तातडीने ताफ्यात सामील करून घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. या नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर पूर्व उपनगरे आणि नवी मुंबईतून दक्षिण मुंबईत येणाऱ्या लाखो प्रवाशांचा दररोजचा प्रवास अत्यंत आरामदायी आणि जलद होणार आहे.

हेही वाचा – Railway Ticket Scam : RTI चा खुलासा! 5 वर्षांत तिकीट दलालीची 2,885 प्रकरणे; दलाली करणाऱ्या आरोपींची माहिती उपलब्ध नसल्याचे पश्चिम रेल्वेचे स्पष्टीकरण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number