जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
लोअर परळ येथील कमला मिल कम्पाऊंडमध्ये ट्रेड हाऊस इमारतीत गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 11 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर आगीत 55 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात 25 महिलांचा समावेश आहे.
या घटनेबाबत मालक अभिजीत मानकर, हितेश संघवी आणि जिगर संघवी याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमला मिल कम्पाऊंडमधील ‘वन-अबव्ह’ पब आणि ‘हॉटेल मोजोस ब्रिस्टोल’ला आग लागली होती. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अग्निशमन दला कडून घटनेची चौकशी सुरू आहे.
एकीकडे नुतन वर्षाचे स्वागत आणि दुसरीकडे हे अग्नितांडव यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.