Mumbai HC Chief Justice: मुंबई उच्च न्यायालयाला मिळणार नवे सरन्यायाधीश; कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर लवकरच मोठा फेरबदल होणार आहे. लवकरच मुंबई उच्च न्यायालयाला नवे सरन्यायाधीश मिळणार आहेत.

Mumbai HC Chief Justice: मुंबई उच्च न्यायालयाला मिळणार नवे सरन्यायाधीश; कोणाच्या नावावर होणार शिक्कामोर्तब?

Mumbai HC Chief Justice: मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायिक पदावर लवकरच मोठा फेरबदल होणार असून, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची बॉम्बे उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश (Chief Justice) म्हणून पदोन्नती करण्याची महत्त्वाची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली आहे. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 6 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारकडून या शिफारसीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाल्यानंतर न्यायमूर्ती त्रिपाठी हे बॉम्बे उच्च न्यायालयाचे 38 वे मुख्य न्यायाधीश म्हणून सूत्रे हाती घेतील. अलाहाबाद उच्च न्यायालयातून या मानाच्या पदावर पदोन्नत होणारे ते 2 रे न्यायाधीश ठरणार आहेत.

दीर्घ वकिली आणि प्रदीर्घ न्यायालयीन अनुभवाचा वारसा

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी 1990 मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी 11 जानेवारी 1992 रोजी वकील म्हणून आपली नोंदणी केली. आपल्या कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी प्रामुख्याने दिवाणी (Civil) खटल्यांमध्ये उत्कृष्ट वकील म्हणून काम पाहिले. ऑक्टोबर 2007 पासून त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे अतिरिक्त मुख्य स्थायी वकील म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय कानपूर विकास प्राधिकरणासह अनेक नामांकित सरकारी महामंडळे व विद्यापीठांचे प्रतिनिधित्व त्यांनी न्यायालयात केले आहे. 27 सप्टेंबर 2013 रोजी त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती झाली, तर 10 एप्रिल 2015 रोजी त्यांना कायमस्वरूपी न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. सध्या ते अलाहाबाद उच्च न्यायालयातील 2 रे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा – Mumbai Footpaths : मुंबईतील रेल्वे स्टेशन, शाळा-रुग्णालयांचे रस्ते होणार अतिक्रमणमुक्त; BMC चा मोठा निर्णय

इतर उच्च न्यायालयांमध्येही मोठ्या फेरबदलांची शिफारस

सध्या बॉम्बे उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती रवींद्र घुगे हे कामकाज पाहत असून, त्यांची कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने देशभरातील विविध उच्च न्यायालयांमधील न्यायाधीशांच्या पदोन्नती आणि बदल्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही. कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयात, तर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्वनी कुमार मिश्रा यांची मुख्य न्यायाधीशपदी शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच ओरिसा उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनाश रंजन पाठक यांची गुजरात उच्च न्यायालयात आणि न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात बदली सुचवण्यात आली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number