CIDCO Housing Lottery : सिडको गृहनिर्माण सोडतीत पुन्हा गोंधळ; घरांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये संताप

नवी मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी हजारो लोकांनी या सोडतीसाठी अर्ज केले होते, मात्र आता सिडकोच्या संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

CIDCO Housing Lottery : सिडको गृहनिर्माण सोडतीत पुन्हा गोंधळ; घरांचे स्वप्न आणखी लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये संताप

CIDCO Housing Lottery : सिडकोच्या गृहनिर्माण सोडतीमधील नियोजनाचा अभाव आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सिडकोच्या 18876 घरांची सोडत लांबणीवर पडली आहे. घरांचे स्वप्न उराशी बाळगून अर्ज केलेल्या शेकडो अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आता घरांच्या विक्रीला स्थगिती दिली आहे. यामुळे ग्राहक आर्थिक संकटात सापडले आहेत. घरांसाठी भरलेली 75 हजार ते 1.5 लाख रुपयांची रक्कम अडकून पडल्याने ग्राहकही आर्थिक संकटात सापडले आहेत.

नवी मुंबईत हक्काचे घर मिळावे यासाठी हजारो लोकांनी या सोडतीसाठी अर्ज केले होते, मात्र सिडकोच्या अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सिडकोने सोडत काढावी, अन्यथा घेतलेले पैसे परत करावेत, अशी मागणी संतप्त ग्राहकांनी केली आहे. आता सिडको ही लॉटरी केव्हा काढणार किंवा ती न काढल्यास नागरिकांचे पैसे परत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – Vadhavan Port: वाढवण बंदराचा पेच सुटला! वाढवण बंदरासाठी 124 ग्रामस्थांनी स्वेच्छेने दिल्या जमिनी; प्रशासनावरील विश्वासाचा विजय

प्रशासनाच्या दिरंगाईवर नागरिकांची टीका
सिडकोच्या या कारभारावर टीका करताना नागरिकांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. वारंवार अशा गोष्टी होत असल्याने सिडकोच्या पारदर्शकतेवर लोकांचा विश्वास उडू लागला आहे. सोडतीची प्रक्रिया जलद आणि सुटसुटीत असणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र नागरिकांना रोज नव्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या प्रकारामुळे सामान्य माणसाच्या खिशाला यामुळे फटका बसत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number