MSRTC : STच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रवास आता हायटेक; मोफत पाससोबत डिजिटल NCMC कार्डची सुविधा

महामंडळाने भविष्यात सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.

MSRTC : STच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रवास आता हायटेक; मोफत पाससोबत डिजिटल NCMC कार्डची सुविधा

MSRTC Retired Employees Free Travel Pass and NCMC Card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या पती/पत्नीला दिल्या जाणाऱ्या मोफत प्रवास सवलतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, एप्रिल 2026 पासून निवृत्त कर्मचाऱ्यांसह, सेवेदरम्यान निधन झालेल्या किंवा अपघातग्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांनाही वर्षभर मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. या नव्या सुविधेमुळे एसटीच्या विविध बससेवांमधून प्रवास करताना केवळ नाममात्र फरकाची रक्कम भरून प्रवासाचा आनंद घेता येईल.

डिजिटल क्रांती: 'RuPay' आधारित NCMC कार्ड
पारंपारिक पास व्यवस्थेला निरोप देत एसटी महामंडळ आता तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहे. मोफत प्रवास पासधारकांसाठी आता 'RuPay On-The-Go' सक्षम NCMC (National Common Mobility Card) प्रणाली लागू करण्यात आली आहे. या डिजिटल कार्डमुळे ओळख पटवणे आणि व्यवहाराची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. NSDL पेमेंट बँकेच्या सहकार्याने ही यंत्रणा कार्यान्वित केली जात असून, राज्यातील विविध आगारांमध्ये अधिकृत एजंटमार्फत या कार्डांचे वितरण आणि नोंदणी प्रक्रिया राबवली जाईल.

हेही वाचा – MHADA New Portal: म्हाडा आणत आहे स्वतःचे 'हायटेक' रेंटल पोर्टल; दलालांची मनमानी थांबणार, भाड्याचे घर शोधणे आता होणार सोपे

कार्ड बंधनकारक करण्याचा प्रस्ताव
महामंडळाने भविष्यात या सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्ड वापरणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आपली नोंदणी करून डिजिटल प्रणालीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे केवळ सामाजिक सुरक्षितताच जपली जाणार नाही, तर महामंडळाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता येणार आहे. एसटी महामंडळ आता काळाची पावले ओळखून कर्मचाऱ्यांच्या हिताचे भान राखणारी आणि डिजिटल बदलांना स्वीकारणारी संस्था म्हणून अधिक सक्षम होत असल्याचे यातून दिसून येते.

अटी आणि सवलतींचे स्वरूप
मोफत प्रवासाच्या या योजनेत सुसूत्रता आणण्यासाठी महामंडळाने काही अटी आणि निकषही निश्चित केले आहेत. यामुळे पात्र कुटुंबांना सवलतीचा नेमका लाभ कसा मिळेल, याबाबत स्पष्टता आली आहे. तंत्रज्ञानाधारित या प्रणालीमुळे बोगस पासधारकांना आळा बसणार असून खऱ्या लाभार्थ्यांना विनाअडथळा प्रवास करता येईल. एसटी महामंडळाची सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा विचार करणारी ठरली असून, या निर्णयाचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.

हेही वाचा – 'Metro Aqua Line 3'चं विद्यार्थी आणि पर्यटकांना खास गिफ्ट, मिळणार अमर्यादित प्रवास करण्याची संधी, पण…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number